Illegal recruitment:BANK:Akola: अकोला जिल्हा सहकारी बँकेच्या नोकर भरतीत बेकायदेशीर प्रकिया; रिजर्व्ह बँक कडे वंचित युवा आघाडीची तक्रार

Illegal recruitment process of Akola District Co-operative Bank;  Complaint of VBA youth front to the Reserve Bank




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला दि. २६ :अकोला जिल्हा सहकारी बँकेच्या नोकर भरतीत एसी, एसटी, ओबीसी, व्हिजेएनटी आरक्षण डावलुन शंभर जागा भरण्याची बेकायदेशीर प्रकिया सुरू करण्यात आली असल्याचा आरोप वंचित बहूजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केला असून, यासंदर्भात रिझर्व्ह बॅंके कडे पातोडे यांनी गुरुवारी तक्रार दाखल केली आहे.




या नोकर भरती मध्ये ज्युनियर क्लार्कच्या १०० जागा भरताना एकही जागा आरक्षित वर्गासाठी नसल्याने या नोकर भरती प्रकरणी पातोडे यांनी तक्रार दाखल केली असून व्यवस्थापन विरुद्ध कार्यवाहीची मागणी करीत नव्याने ही भरती प्रक्रिया राबवून आरक्षित जागांसह नौकर भरती करण्याची मागणी करण्यात आली आहे.




अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अकोला या बँकेच्या १०० ज्युनिअर क्लर्क अर्थात कनिष्ठ लिपिक (सपोर्ट स्टाफ) या पदासाठी मराठी ऐवजी चक्क इंग्रजीत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ४ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले असून त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त किंवा इतर मागासवर्गीय ह्यांचे करीता कोणतेही आरक्षण ठेवण्यात आलेले नाही,असे देखील पातोडे यांनी सांगितले आहे.




बँकेचे अधिकृत संकेतस्थळ या ठिकाणी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अकोला च्या ज्युनिअर क्लर्क अर्थात कनिष्ठ लिपिक पदासाठी उमेदवार प्रत्येक उमेद्वाराला १००० रुपये भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. या पदासाठी शैक्षणिकदृष्ट्या योग्य उमेदवार करीता जाहिरात प्रकाशित केली असे जाहीर केले आहे. 




सुरुवातीला दहा हजार पगार व नंतर कायम स्वरुपी पंचवीस हजार पगार देण्यात येणार आहे असा उल्लेख जाहिरातीत आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अकोला ( www.akoladccbank.com ) च्या नोकरभरतीसाठी अकोला हे परीक्षा केंद्र नाही.उमेदवारांना बाहेरील परीक्षा केंद्रावर जावे लागेल.जिल्हा बँकेच्या नोकरीत एसी, एसटी, ओबीसी, व्हिजेएनटी यांना आरक्षण डावलून ही नियमबाह्य नौकर भरती करण्याचा डाव आहे.जिल्हा बँकेच्या नोकरीतील आरक्षण रद्द करण्यात आले असून सरसकट एक हजार रुपये परीक्षा शुल्क उकळले जात असल्याचा आरोप राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.



जिल्हा बँकेची जाहिरात  मराठी मध्ये नसून इंग्रजी मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.ह्या सर्व गैरप्रकारांना आळा बसावा ह्यासाठी राजेंद्र पातोडे यांनी रिझर्व्ह बॅंके कडे तक्रार दाखल केली आहे.जिल्हा बँकेचे व्यवस्थापना विरुद्ध कार्यवाहीची मागणी करीत नव्याने ही भरती प्रक्रिया राबवून आरक्षित जागांसह नौकर भरती करण्याची मागणी पातोडे यांनी केली  आहे.

टिप्पण्या