HSC EXAM RESULT: बारावीचा निकाल जाहीर: राज्यात कोकण विभाग अव्वल; औरंगाबाद विभाग सर्वात मागे,यंदाही मुलींनीच मारली बाजी

 12th result announced: Konkan division tops in the state;  Aurangabad division is at the back, this time too the girls won (file image)




पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज जाहीर केला आहे. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education ( MSBSHSE) (Class 12 HSC results 2021) यावर्षी राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के एवढा लागला असून, मागील वर्षीच्या तुलनेत निकालात 8.97 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवेळी प्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. निकालात कोकण विभाग राज्यात अव्वल असून, औरंगाबाद विभाग टक्केवारीत सर्वात मागे आहे. दरम्यान, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कौतूक केले आहे.तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावे, असे म्हंटले आहे.




करोना संकट काळात बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यामुळे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल लावण्याचे निकष तयार करून त्याची अंमलबजावणी केली आहे. दहावीसाठी 30 टक्‍के, अकरावीसाठी 30 टक्‍के, बारावीसाठी 40 टक्‍के याप्रमाणे 100 टक्‍के गुणाप्रमाणे मुल्यमापनाद्वारे हा निकाल आज राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी जाहीर केला आहे. या परीक्षेसाठी राज्यातील 13 लाख 19 हजार 754 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती.




विभागाचा टक्केवारीत निकाल 


पुणे विभाग - 99.75 

नागपूर विभाग - 99.62  

औरंगाबाद विभाग- 99.34  

मुंबई विभाग - 99.67  

कोल्हापूर विभाग - 99.67  

अमरावती विभाग - 99.37  

नाशिक विभाग- 99.61  

लातूर विभाग - 99.65  

कोकण विभाग- 99.81 


उत्तीर्ण मुले-मुली:निकाल टक्केवारीत


मुले - 99.53 टक्के

मुली -99.63 टक्के




ऑनलाईन निकाल पाहण्याची सुविधा

सर्व विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. विषयनिहाय मिळालेल्या गुणांची प्रिंटही विद्यार्थ्यांना काढता येणार आहे. 



कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाशिवायची इतर सांख्यिकीय माहिती www.mahresult.nic.in आणि https:msbshse.co.in या संकेतस्थळावर मिळणार आहे.


निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ

1) https://hscresult.11thadmission.org.in

2) https://msbshse.co.in

3) hscresult.mkcl.org

4) mahresult.nic.in



असा पाहावा निकाल


Step 1



Step 2



Step 3



टिप्पण्या