HSC Exam result: अखेर बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली; निकाल उद्या जाहीर होणार

                                     संग्रहित चित्र




मुंबई: कोरोना विषाणू थैमान घालत असल्यामुळे दहावीचा निकाल कसाबसा जाहीर झाल्यानंतर बारावीच्या निकालाची प्रतिक्षा होती. आता मात्र बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा देखील संपली आहे आहे. निकालाची तारीख आज जाहीर केली आहे. तर परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या बारावीचा निकाल मंगळवारी ०३ ऑगस्ट रोजी दुपारी ४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याबाबतची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज सायंकाळी केली आहे. 




कोरोना संकटामुळे बारावीची परीक्षासुद्धा रद्द करण्यात आली होती. यानंतर दहावी प्रमाणे अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे बारावीचा देखील निकाल तयार करण्यात आला आहे.


वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा


"महत्त्वाची सूचना: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला इ.१२वीचा निकाल उद्या दि.०३ ऑगस्ट,२०२१ रोजी दु.४:०० वा. जाहीर होईल. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!", असे ना. वर्षा गायकवाड यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर म्हंटले आहे.






बोर्डाच्या पुढील अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे


१ https://hscresult. 11thadmission.org.in


२. https://msbshse.co.in


३. hscresult.mkcl.org.


४. mahresult.nic.in.




www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या

निकाला शिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल,अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.







टिप्पण्या