FootballTournament:tiebreaker: रोमांचित सामन्याचा निर्णय टायब्रेकरने; ओवेस खान फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद उस्मान आझाद संघाकडे







ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे 25 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या ओवेस खान फुटबॉल टूर्नामेंटचा अंतिम सामना  उस्मान आझाद आणि खान रायडर्स या दोन बलाढ्य संघात आज रविवारी सायंकाळी खेळला गेला. सामन्याच्या निर्धारित क्षणापर्यंत दोन्ही संघाने 01-01 अशी बरोबरी साधल्याने, अखेर टायब्रेकर मध्ये सामन्याचा निर्णय झाला.यामध्ये उस्मान आझाद संघाने सर्वाधिक गोल करीत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.


सामना समाप्ती नंतर लगेच बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. विजेता-उपविजेता संघाला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. विजेता संघाला विजयी चषक व सहा हजार रोख तर उपविजेता संघाला चषक आणि पाच हजार रोख रक्कम प्रदान करण्यात आली.


प्रमुख अतिथी म्हणून हाजी अब्दुल रहमान, श्याम अवस्थी, जावेद अली, मोईन खान, मोंटू खान, मुंकीर खान, नगरसेवक मो. इरफान, शंकर कंकड, सीनियर फुटबॉल कोच सत्तार सर, शेख गणी, नतिकोद्दीन बाबर, एजाज खान  इस्राईल खान, समीर खान, तन्वीर खान,मतीन शेख, सलीम भाई, ताहेर अली, करण चिमा, डॉ.अभय पाटील,अंजार खान, वाहिद खान.अमीन खान, मुजीब खान, आरिफुरहेमान खान यांची उपस्थिती होती.




13 संघांचा सहभाग


स्पर्धेचे आयोजन हसन खान आणि एकता ग्रुपच्या वतीने केले होते. आयोजन समिती मध्ये प्रमुख आयोजक हसन खान, राजीक खान, शोएब खान, मेहबूब खान, ताज खान, मुजीब खान, जुनेद खान यांचा समावेश होता. या स्पर्धेत एकूण 13 संघ सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने ओवेस इलेव्हन, उस्मान आझाद, खान रायडर्स, मॉर्निंग फुटबॉल क्लब, यंग स्टार, मोमीन पुरा आदी नावाजलेल्या संघांचा सहभाग होता.


फुटबॉलप्रेमींची गर्दी


स्पर्धेतील अंतिम सामना बघण्यासाठी फुटबॉल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोना अटी व नियम लागू असल्याने मर्यादित संख्येत प्रेक्षक होते. अन्यथा अकोलेकर फुटबॉल प्रेमींनी सर्व सामने बघण्यासाठी प्रचंड गर्दी केली असती. संपूर्ण स्टेडियम प्रेक्षक गॅलरी प्रेक्षकांनी भरली गेली असती, असे यावेळी आयोजक राजीक खान यांनी म्हंटले.




Referees 


1)Shoeb khan 

2)Juned khan  

3)Anzar Qureshi 

4)Abdul Aziz

5)Shaikh shoeb 

6)Shahid khan 

7)Naved khan





टिप्पण्या