- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Owais Khan Football Tournament: Usman Azad and Khan Riders win thrilling match
ॲड.नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे 25 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या ओवेस खान फुटबॉल टूर्नामेंट अंतिम टप्प्यात पोहचली आहे. स्पर्धेचे आयोजन हसन खान आणि एकता ग्रुपच्या वतीने केले आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीतील रोमहर्षक सामन्यात बलाढ्य उस्मान आझाद आणि खान रायडर्स संघांनी विजय मिळवून अंतिम फेरीत धडक दिली.
उस्मान आझाद 2 गोलने विजयी
आज शनिवारी स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने खेळविण्यात आले. पहिला सामना उस्मान आझाद विरुद्ध मोमीन पुरा या दोन दिगग्ज संघात खेळला गेला. उस्मान आझाद संघाने आपल्या नावाला साजेशी खेळी खेळत दोन गोलने या सामन्यावर विजय मिळविला.
खान रायडर्सने सामना जिंकला
दुसरा सामना ओवेस इलेव्हन विरुद्ध खान रायडर्स संघात खेळला गेला. हा सामना अतिशय रोमहर्षक झाला. खान रायडर्स संघाने सुंदर खेळप्रदर्शन करीत 0-1 ने सामना जिंकला.
प्रमुख उपस्थिती
आजच्या सामना प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून हाजी अब्दुल रहमान, श्याम अवस्थी, जावेद अली, मोईन खान, मोंटू खान, सीनियर फुटबॉल कोच सत्तार सर आदी उपस्थित होते.
या सामन्यात रेफरी म्हणून जुनेद खान, अंजार अहमद कुरेशी, शोएब खान, अब्दुल अजीज, मोहम्मद नावेद, शाहिद खान यांनी काम पाहिले.
13 संघांचा सहभाग
या टूर्नामेंट चे प्रमुख आयोजक हसन खान, राजीक खान, शोएब खान, मेहबूब खान, ताज खान, मुजीब खान, जुनेद खान हे आहेत. या स्पर्धेत एकूण 13 संघ सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये अनुभवी व प्रसिद्ध खेळाडू आपले खेळ कौशल्य प्रदर्शित करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ओवेस इलेव्हन, उस्मान आझाद, खान रायडर्स, मॉर्निंग फुटबॉल क्लब, यंग स्टार, मोमीन पुरा आदी नावाजलेल्या संघांचा सहभाग आहे.
स्पर्धा उदघाटन
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर अभय पाटील, माजी नगरसेवक नकिर खान, डॉक्टर रावळकर, मुकीर खान, सागर भारूका, करण चिमा, जनाब आरिफ, एजाज खान, नगरसेवक इरफान खान, मुजीब खान, शंकर कांकळ,वरिष्ठ फुटबॉल कोच अब्दुल सत्तार मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
Date 27/08/2021
Quarter final result
Owais 11 5-0 anjuman fc
Khan riders 4-0 morning fc
Referees
1)Shoeb khan
2)Juned khan
3)Anzar Qureshi
4)Abdul Aziz
5)Shaikh shoeb
6)Shahid khan
7)Naved khan
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा