- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Education: Akola:NMMS Exam: जिल्ह्यातील 177 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र; 'एनएमएमएस'मध्ये यश, परीक्षेचा निकाल जाहीर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Education: Akola: NMMS Exam: 177 students in the district eligible for scholarships; Success in NMMS, test results announced (file image)
अकोला: सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवतीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती १२ वी पर्यंत मिळते. सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु. १,०००/ (वार्षिक रु.१२,०००/-) आहे.
इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उपन्न रु. १,५०,०००/- पेक्षा कमी आहे व ८ जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधार सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते.
या संकेतस्थळावर मिळेल माहिती
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक ०६ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या www.mscepune.in व www.nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे.
अकोलाने राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२०-२१ चा (एनएमएमएस) निकाल बुधवार, १८ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. त्यात अकोला जिल्ह्यातील विविध शाळांचे १७७ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून, शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
कोरोना काळात सुद्धा जिल्ह्यातील बऱ्याच शाळांनी 'एनएमएमएस परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
६ एप्रिल २०२१ ला घेण्यात आली होती. त्यातून १७७ विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्रता सिद्ध केली. संबंधित विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीपर्यंत प्रतिमाह एक हजार रुपये याप्रमाणे चार वर्षांत ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार असून, सदर रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
तालुका निहाय शिष्यवृत्ती (NMMS) पात्र विद्यार्थी यादी
1. तेल्हारा - 65
2. अकोट - 54
3.अकोला - 39
4. मुर्तिजापूर - 08
5. बार्शीटाकळी - 05
6. बाळापूर - 04
7. पातूर - 02
एकूण - 177 विद्यार्थी.
जिल्ह्यातून संवर्ग निहाय प्रथम विद्यार्थी / विद्यार्थिनी व शाळेचे नांव :
1. GENERAL - पळसकर रिधी ज्ञानेश्वर - श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विघालय वडाळी देशमुख ता..अकोट
2. OBC - बुरघाटे अक्षय उमेश - नुतन विद्यालय,बेलखेड ता.तेल्हारा
3. SC - बोदडे यश गजानन
राजीव गांधी विद्यालय,तळेगांव बाजार ता.तेल्हारा.
4. ST - पवार श्रेया ज्ञानेश्वर
न्यू इंग्लिश हायस्कूल अकोला.
5.SBC - ढगे सिध्दांत सतिश - न्यू इंग्लिश हायस्कूल,अकोला.
6. NT - B - ढोले शामल नंदलाल - मोहरिदेवी खंडेलवाल कन्या विद्यालय,अकोला.
7. NT - C - टाकळे वैष्णवी क्रांती - महाराष्ट्र माध्यमिक शाळा अकोला.
8. NT - D - गोरवे सानिका गजानन - ज्ञानप्रकाश विद्यालय,पिंजर ता.बार्शी टाकळी.
9. VJ-A - राठोड पल्लवी श्रावण.- भारतीय ज्ञानपीठ विद्यालय, मूर्तिजापूर.
10. EWS - देशमुख नंदिनी राजेश - ज्ञानप्रकाश विद्यालय,पिंजर ता.बार्शी टाकळी
11. Locomotor Disability (LD) - देशमुख सुरज किशोर - श्री. नरसिंग विद्यालय,अकोट.
यांनी केले पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन
मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.अकोला सौरभ कटीयार (भा.प्र.से.), डॉ वैशाली ठग (शिक्षणाधिकारी प्राथ. जि.प.अकोला), दिलीप तायडे, शिक्षणाधकारी माध्य. जि.प.अकोला, हरिष गुरव, नायब तहसिलदार अकोट, रतनसिंग पवार गटशिक्षणाधिकारी प.स.बार्शी टाकळी, श्याम राऊत गटशिक्षणाधिकारी प.स.अकोला, दिनेश दुतंडे गट शिक्षणाधकारी प.स.तेल्हारा, गौतम बडवे गटशिक्षणाधकारी प.स. बाळापूर, संजय मोरे गटशिक्षणाधिकारी प.स. मुर्तिजापूर, संदिप मालवे गट शिक्षणाधिकारी प.स.अकोट, दीपमाला भटकर गटशिक्षणाधिकारी प.स.पातूर, अरविंद जाधव सा.शिक्षण उपनिरीक्षक. शब्बीर हुसैन, शत्रुघ्न बिरकड अध्यक्ष विदर्भ माध्यमिक मुख्याध्यापक संघ, बळीराम झामरे अध्यक्ष अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघ, दिनेश तायडे सचिव अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघ,प्रा.डॉ. रविंद्र भास्कर, दिपक गोल्डे, सुरेश किरतकर, अनिल जोशी, रामेश्वर धर्मे, विलास घुंगड, रविंद्र वर्गे, सुनील वावगे, संतोष जाधव, देवानंद,मुसळे, प्रभु चव्हाण, मनिष निखाडे,अनंता लंके,विजय पजई, ओरा चक्रे, एस.आर.निखाडे, मुरलीधर थोरात, नितीन तिवारी, के. पी.पाटील, अनिल भारसाकळे यांनी केले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा