Dhobi Samaj Reservation: राज्य धोबी समाज आरक्षणसाठी समाजनेत्यांची मुंबई - दिल्ली वारी; आतातरी आरक्षणाचा प्रश्न सुटणार का?

नवी दिल्ली येथे नितीन गडकरी व विरेंद्र कुमार यांची केंद्रात आरक्षण संदर्भात परिट समाजाने घेतली भेट




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: परीट धोबी समाजाला आरक्षण मिळवून देण्याकरिता समाज नेते डी. डी. सोनटक्के व अनिल शिंदे यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. चार पाच दिवसांपूर्वी मुंबईत जाऊन संबंधित मंत्र्यांना भेटून तेथूनच फाईल्स सोबतच थेट दिल्ली गाठली. दिल्लीत जाऊन केंद्रीय समाजकल्याण मंत्र्यांची ना. नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने भेट घेवून, परीट धोबी आरक्षणाचा प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. समाज नेत्यांनी दिल्ली-मुबंई वाऱ्या केल्यावर आतातरी लवकर आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का,असा प्रश्न समाजबांधवाना पडला आहे.



ना. गडकरी डॉ. वीरेंद्र कुमार, कृष्णपाल यादव यांच्याशी भेट

गुरुवार २९ जुलै रोजी दिल्ली येथे ना. गडकरी व ना. डॉ. विरेंद्र कुमार, खासदार डॉ. कृष्णपाल यादव यांची भेट घेऊन परीट धोबी समाजाला केंद्रात आरक्षण मिळण्याकरिता सविस्तर चर्चा करण्यात आली. ना.गडकरी यांनी  ना.डॉ.विरेंद्र कुमार यांना फोन केला.व बोलले की, "आपण खासदार होते तेव्हा लोकसभेत धोबी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला होता. आणि आता तर आपण या खात्याचे मंत्री आहात त्यामुळे या समाजाला नक्कीच न्याय मिळाला पाहिजे", असे सांगितले. यावेळी प्रामुख्याने आमदार दिनेश चौधरी, डी डी सोनटक्के, अनिल शिंदे, रुकेश मोतीकर तसेच  भैय्याजी रोहणकर, राजेंद्र श्रीवास उपस्थित होते. 




मुंबईला जावूनही केला पाठपुरावा


मुंबई येथे २८ जुलै रोजी डी.डी. सोनटक्के, अनिल शिंदे व संतोष सवतीरकर यांनी फाईलचा पाठपुरावा करून तेथूनच दिल्लीला जाऊन मान्यवरांच्या भेटी घेतल्या. समाजाच्या समस्या मांडल्या. 



जसा आता पर्यंत आपण आरक्षण मिळण्याकरिता पाठपुरावा केला असाच आम्ही पाठपुरावा करू. धोबी पारिट समाजाला आरक्षण मिळाल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे ठामपणे  अनिल शिंदे यांनी भारतीय अलंकारशी संवाद साधताना सांगितले.

टिप्पण्या