Covid19: third wave: Akola: जम्बो सिलेंडर ऑक्सिजन प्लांटची उभारणी अंतिम चरणात;आमदार सावरकर यांनी केली पाहणी

 सी.एस.आर फंडातून १४० जम्बो सिलेंडर चा ऑक्सिजन प्लांटची उभारणी अंतिम चरणात 




अकोला: अकोला, वाशीम, बुलढाणा, हिंगोली, अमरावती जिल्ह्यातील रुग्णांना संजीवनी ठरणारे व कोविड १९ च्या तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री खा. संजय धोत्रे यांच्या दूरदृष्टी व आपले सहकारी आ. गोवर्धन शर्मा, आमदार तथा जिल्हा भाजपा अध्यक्ष, रणधीर सावरकर,आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते ना. देवेंद्र फडणवीस यांच्या कडून सी.एस.आर फंडातून १४० जम्बो सिलेंडर चा ऑक्सिजन प्लांटची उभारणी अंतिम चरणात आहे. हॉस्पिटल मधील रुग्णांना असुविधा होणार नाही, या दृष्टीने लोकार्पण सोहळा लवकरच होणार असून जिल्हा भाजपा अध्यक्ष आ. रणधीर सावरकर यांनी आज जिल्हा सर्वोपचार रुग्णालय व अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरास भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. 

   

हा ऑक्सिजन प्लांट दररोज १४० जम्बो सिलिंडरच्या बरोबरीने ऑक्सिजन निर्माण करण्यास सक्षम असणार असून हॉस्पिटलला दररोज सुमारे 100 रुग्णांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम असेल. यामुळे वेळेची व आर्थिक बचत होणार आहे. 



या संदर्भात आ. रणधीर सावरकर यांनी पाहणी करून अकोला सर्वोपचार रुग्णालयास या पुढे कमतरता भासणार नाही व बाराही महिने ऑक्सिजन साठा उपलब्ध राहणार आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अकोला दौऱ्यामध्ये दिलेल्या वाचनाची पूर्तता करून तीन महिन्यात ऑक्सिजन प्लांट उभा केला आहे. तसेच आ. गोवर्धन शर्मा, यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत दोन ऑक्सिजन प्लांट्स अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उभारणी होत आहे. तसेच नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत खा. संजय धोत्रे यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लांट उभे आहे. महामारीच्या काळात अकोला जिल्ह्यात महाराष्ट्राच्या १२ जिल्ह्यातील रुग्णांनी आजारपणात लाभ घेतला होता. आज आ. रणधीर सावरकर यांनी पाहणी केली. त्यांचे समवेत राजेश बेले, अंबादास उमाळे, शंकरराव वाकोडे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या