blood donation camp:फ्लाइंग कलर्स फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद;महिलांनीही केले स्वयंस्फूर्तीने रक्तदान

Spontaneous response to Flying Colors Foundation's blood donation camp; women also donated blood voluntarily



 

नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: फ्लाइंग कलर्स एज्युकेशन फाउंडेशन ही सामाजिक संस्था गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मोफत सेवा देते. शहराच्या मध्यवर्ती भागातील मोमीनपुरा मधील कलालची चाळ येथे एक वैद्यकीय मदत केंद्र (MRC) देखील चालवते. येथून दररोज अनेक रुग्णांना मोफत वैद्यकीय मदत दिली जाते. गरजू रुग्णांना गरज पडल्यास तातडीने रक्त उपलब्ध करून देता येईल, या उद्देशाने फाऊंडेशनने रविवार 1 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात एकूण 75 पुरुष व महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात प्रथमच परिसरातील महिलांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले, हे येथे उल्लेखनीय.





श्री शिवाजी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक डॉ जिया-उल-हसन साहब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या भव्य रक्तदान शिबिरात डॉ. इकरार राजा, डॉ. मोसलेह उद्दिन शेख (वैद्यकीय अधिकारी), सनीश शहा, रमेश पाटणकर आणि मोहम्मद अली हे प्रमुख पाहुणे होते.




रोटी बँकेचे सदस्य रियाज अहमद खान यांच्या हस्ते कुराण पठण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तर फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ मुजाहिद अहमद यांनी वैद्यकीय मदत केंद्राकडून आतापर्यंत केलेले कार्याचा संक्षिप्त अहवाल सादर केला. संस्थेचे अध्यक्ष डॉ.जुबेर नदीम यांनी रोटी बँक, कपड़ा बँक, वैद्यकीय मदत केंद्र, अल्पसंख्याक विकास केंद्र आणि रोजगार अभियान यासारख्या संस्थेने चालवलेल्या विविध सामाजिक कामांवर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि संस्थेच्या सर्व कार्याचे कौतुक केले.



कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ जिया-उल-हसन साहब यांनी सर्व अकोलावासीयांना या वैद्यकीय मदत केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक शेरू मिश्रा यांचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन सय्यद मोहसीन अली यांनी केले तर आभार समीर खान यांनी केले.




हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यात संस्थेचे अध्यक्ष डॉ जुबैर नदीम, डॉ मुजाहिद अहमद, रियाज खान, अब्दुल रहीम सर, रिजवान जमील खान, राहील अफसर, सय्यद मोहसीन अली, समीर खान, उबेद शेख, मो तल्हा, ओबैदुल्लाह खान, मुहिब रजा, शेख नदीम आणि शेख उस्मान यांनी  प्रयत्न केले.

टिप्पण्या