BAnews24 impact: Akola city: Illegal construction: विजय मालोकर यांच्या प्रयत्नांना यश; जिल्हाधिकारी यांच्या एका आदेशामुळे अवैध बांधकाम करणारे व भूखंड माफियांचे धाबे दणाणले




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : शहरामधुन वाहणा-या मोर्णा व विद्रुपा नदीपात्रातील नीळी आणि लाल रेषा झोन मध्ये झालेल्या अवैध बांधकामाचे खरेदी-विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी काढले आहेत. या एका आदेशामुळे आता अवैध बांधकाम व्यवसायिक आणि भूखंड माफियांमध्ये खळबळ माजली आहे.

सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकर यांनी सर्वप्रथम या प्रश्नावर आवाज उठवून, ही बाब समोर आणली होती. तर भारतीय अलंकार न्यूज 24 ने सर्वप्रथम याबाबतचे वृत्त प्रकाशित करून, हा प्रकार जनते समोर आणला होता, हे येथे उल्लेखनीय आहे.


" राज्यात अतिवृष्टीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ' कठोर निर्णय घ्यावे लागतील ' असे वक्तव्य केले होते त्याला अनुसरून जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी हे आदेश पारित केले त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. 

भारतीय अलंकार न्यूज 24 ने ही बातमी निर्भीडपणे प्रकाशित करून मुद्दा लावून धरून हा प्रकार सर्वांसोमर आणला त्या बद्दल मी त्यांचेही आभार मानतो. या आदेशामुळे भविष्यात होणारी जीवित व वित्त हानी टळली अस मला वाटते.."


विजय मालोकर

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते


याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अकोला शहरामध्ये 21 व 22 जुलैला विद्रुपा नदीला आलेल्या महापुरामुळे नदी काठावरील चांदुर, कैलास टेकडी, कौलखेड ,खेतान नगर, सिंधीकॅम्प,अनिकट आदी भागात पुराचे पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले होते. याभागातील अनेक मोठ्या बांधकाम व्यवसायिक आणि भुखंड माफियांनी येथील ब्ल्यू लाईनच्या आता घर,डुप्लेक्स , इमारती बांधून सर्व नियमांची पायमल्ली केली असल्याचे आढळून आले आहे.या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकार यांनी सर्वप्रथम आवाज उठवून, माहितीचा अधिकाराचा वापर करून याबाबतचे सर्व पुरावे गोळा करून अमरावती विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर आता अकोला शहरामधुन वाहणाऱ्या मोर्णा व विद्रुपा नदी काठावरील या भागातील निळी आणि लाल रेषा झोन मध्ये झालेल्या अवैध बांधकामाचे होणारे खरेदी-विक्री व्यवहार तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी 12 ऑगस्ट रोजी काढले आहेत. या एका आदेशामुळे अवैध बांधकाम करणारे आणि भूखंड माफिया यांचे धाबे दणाणले आहे. 



या प्रकरणाची सखोल चौकशी होवून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी विजय मालोकर यांच्यासह पुरपीडित नागरिकांनी केली आहे.  





हे सुध्दा वाचा: भारतीय अलंकार news 24 ने सर्वप्रथम प्रकाशित केलेल्या यासंदर्भातील वृत्ताची लिंक:

टिप्पण्या

  1. गोरक्षण रोडवरील निवारा नं.चार व पाच मधील अवैध बांधकाम तसेच निवारा नं. पाचचे पूर्ण डी पी रोडवरील बांधकामाकडेही असेच लक्ष द्यावे ही विनंती.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा