Annabhau sathe jayanti:Akola: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुतळा अकोल्यात उभारला; जयंतीनिमित्त संजय धोत्रे यांच्या हस्ते लोकार्पण

A huge statue of Sahityaratna Lokshahir Annabhau Sathe  



नीलिमा शिंगणे -जगड

अकोला: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कृतीशील साहित्यिक होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र त्यांनी सामान्य माणसापर्यंत नेलं. दुर्बल, वंचित, उपेक्षित समाज बांधवांचा वास्तववादी जीवनसंघर्ष साहित्यातून जगासमोर आणला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य नव्यापिढीला कळावे, यासाठी अकोल्यात भव्य पुतळा निर्माण करण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण रविवारी करण्यात येत आहे.




अकोला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंती निमित्त राजराजेश्वर नगरी मध्ये अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष व अकोला पूर्व आमदार रणधीर सावरकर यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत हा पुतळा निर्माण करण्यात आला आहे. अकोला शहराच्या सौंदर्यामध्ये देखील हा पुतळा भर घालणार आहे.  



कामगार साहित्य तसेच सामाजिक समरसतेचे मार्गदर्शक उत्कृष्ट शाहीर मागासवर्गीय समाजासाठी संघर्षशील व्यक्ती महत्त्व अण्णाभाऊ साठे यांचा अकोल्यात भव्य दिव्य पुतळा उभारणी करून जनतेच्या सेवेसाठी श्रद्धासुमन तसेच जन्मशताब्दीनिमित्त त्यांना अभिवादन कार्यक्रम त्यांच्या जयंती दिनानिमित्त एक ऑगस्ट रविवार रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक रेल्वे टेशन  चौक येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात लोकार्पण सोहळा होत आहे. 




अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, तेजराव थोरात, उपमहापौर राजेंद्र गिरी, रामदास तायडे, वामन भिसे, एडवोकेट राजेश प्रधान, राम खरात, गणेश सपकाळ, विजय बांगर, शेषराव खवले,  मनीराम टाले, रामकृष्ण डोंगरे, धनंजय धबाले ,टोनी जयराज, जानवी डोंगरे, आरती धोगलीया, राहुल देशमुख, सुरेश जाधव, अविनाश जाधव, सारिका जयस्वाल, अनिता चौधरी ,एडवोकेट देवाशीष काकड आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. 










टिप्पण्या