Vaccine shortage:Akola: लसीचा तुटवडा: उद्या अकोल्यातील लसीकरण बंद; 59 कोरोनाग्रस्त घेताहेत उपचार

                                     file image




अकोला: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र, लस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून लसीचा साठा येत नसल्याने वेळोवेळी अकोल्यात काही केंद्रांवर लसीकरण बंद ठेवावे लागले होते. परंतू आता लस साठाच उपलब्ध नसल्याने अकोल्यातील सर्वच केंद्र उद्या बंद असणार आहे. 



सोमवार 26 जुलै रोजी लसीचा साठा नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. लसीचा साठा आल्यावर लसीकरण पुन्हा सुरु केले जाईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून रविवारी देण्यात आली आहे.



कोरोना अलर्ट


152 अहवाल प्राप्त, एक पॉझिटीव्ह


 

आज रविवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 152 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 151 अहवाल निगेटीव्ह तर एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.


त्याच प्रमाणे काल (दि.24) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57748(43167+14404+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह दोन.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 302779 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 299237 फेरतपासणीचे 397 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3145 नमुने होते. आजपर्यंत एकूण 302752 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 259585 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


एक पॉझिटिव्ह


आज  दिवसभरात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका पुरुषांचा समावेश असून तो अकोला मनपा क्षेत्रातील आहे. दरम्यान काल (दि.24) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांत एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.


59 जणांवर उपचार सुरु


जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57748(43167+14404+177) आहे. त्यात  1133 मृत झाले आहेत. तर 56556 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 59 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.




रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.24) दिवसभरात झालेल्या 470 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.




काल दिवसभरात  अकोला येथे तीन, अकोट येथे 31, बाळापूर येथे 28, बार्शीटाकळी येथे दोन, तेल्हारा येथे 16, मुर्तिजापूर येथे पाच, अकोला महानगरपालिका येथील 308, अकोला आयएमए येथील दोन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 33, वैद्यकीय महाविद्यालय येथे 34 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर हेगडेवार लॅब येथे आठ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे 470 जणांच्या चाचण्या होऊन त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लक्ष 640 चाचण्या झाल्या पैकी 14464 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.





सूचना

"उद्या दिनांक 26/07/2021 रोजी 

लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्यामुळे सर्व केंद्र बंद राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी."

-अकोला महानगरपालिका अकोला

टिप्पण्या