Union cabinet expansion: कोणाची पडणार विकेट; कोणाला मिळणार संघात स्थान, कोणाला मिळणार नारळ...अवघ्या काही तासात चित्र होणार स्पष्ट




नवी दिल्ली: मोदी मंत्रीमंडळ विस्तारात आज काहींची विकेट पडणार आहे.  काहींना संघात स्थान मिळणार आहे. तर काहींना परत खेळण्याची संधी मिळणार आहे. आज संध्याकाळी साडेपाच वाजता हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.तोपर्यंत ठोकताळे लावणे आणि चर्चा सुरू असणार आहे. दरम्यान, राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. हा मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला विस्तार आहे. मोदी सरकार मधील जवळपास 24 मंत्रीपदाच्या जागा रिक्त आहेत. आज होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात 14 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. तर काहींना घरचा आहेर व नारळ मिळणार असल्याची शक्यता आहे.




दरम्यान, नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया, सर्बानंद सोनोवाल, आरसीपी सिंह, अजय भट्ट, अजय मिश्रा, कपिल पाटिल, भागवत कराड, डॉ. भारती पवार, शोभा करांदलाजे, पुरुषोत्तम रुपाला, किशन रेड्डी, पशुपति पारस, मीनाक्षी लेखी, अनुप्रिया पटेल, भूपेंद्र यादव, सुनीता दुग्गल, शांतनु ठाकुर, अनुराग ठाकुर यांना मंत्रिमंडळ मध्ये स्थान मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. 




हर्षवर्धन, रावसाहेब दानवे, देबाश्री चौधरी, रतनलाल कटारिया, सदानंद गौडा, थावरचंद गहलोत, रमेश पोखरियाल निशंक ,संतोष गंगवार, संजय धोत्रे यांना घरी पाठविण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.




अनुराग ठाकुर, पुरुषोत्तम रुपाला, किशन रेड्डी, किरण रिजिजू, हरदीप सिंह पुरी, मानुष मा यांना परत संधी मिळणार असल्याचे समजते.



दरम्यान, नारायण राणे हे पत्नीसह दिल्लीत दाखल झालेले आहेत. राणे यांच्यासह महाराष्ट्रातून खासदार कपिल पाटील, हिना गावीत, भागवत करता यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अवघ्या काही तासात हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.मात्र,नव्या मंत्रिमंडळ मध्ये कोण आऊट कोण इन राहील, याबाबत राजकीय क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे,एवढे मात्र निश्चित.


टिप्पण्या