SSC BOARD RESULT 2021: न झालेल्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर: कोकण विभाग अव्वल; नागपूर विभागाची टक्केवारी सर्वात कमी, साईट ओपन होत नसल्याने विद्यार्थी-पालक नाराज


                                      file photo


पुणे : न झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. मात्र,  विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील निकालाची माहिती दिली आहे.



कोकण अव्वल


यंदाची निकालाची टक्केवारी 99.95 टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला असून, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचस आहे. नागपूर विभागाचा 99.55 टक्के आहे. पुनर्परीक्षार्थी निकालाची टक्केवारी 90.85 इतकी आहे. 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.



मुलींची बाजी

निकालात पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थिनी पुन्हा अव्वल असून मुलींच्या निकालाची टक्केवारी 99.96% इतकी आहे. मुलांची टक्केवारी 99.94% असून राज्यातील 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 % लागला आहे.




दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के


6922 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले असून 9 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. 27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के लागला आहे.


श्रेणी सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी


परीक्षा निकालाची प्रक्रिया सगळीच नवीन असून तरीही वेळेत काम पूर्ण झाले आहे, सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली असल्याची प्रतिक्रिया दिनकर पाटील दिली आहे. तसंच श्रेणी सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी मिळणार असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितले.




असा पहा निकाल


निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in जा


SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा.


या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाइप करा. सीट नंबर स्पेसशिवाय टाइप करा.


आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका.


लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.


तुम्हाला तो निकाल डाऊनलोड करता येणार आहे. विद्यार्थी संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउटही काढू शकणार आहेत.


विभागानुसार टक्केवारी


कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी 99.84 टक्के लागला आहे.



कोकण विभागाचा निकाल 100


पुणे विभागाचा निकाल 99.96 टक्के


नागपूर विभागाचा निकाल 99.84 टक्के


औरंगाबाद विभागाचा निकाल 99.96 टक्के


मुंबई विभागाचा निकाल 99.96 टक्के


कोल्हापूर विभागाचा निकाल 99.92 टक्के


अमरावती विभागाचा निकाल 99.98 टक्के


नाशिक विभागाचा निकाल 99.96 टक्के


लातूर विभागाचा निकाल 99.96 टक्के


नागपूर विभागाचा निकाल 99.84


यंदाही दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी 99.96 टक्के आहे. तर मुलांच्या निकालाची टक्केवारी 99.94 टक्के इतकी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के लागला आहे.




दोन्ही वेबसाईट ओपन होईना:विद्यार्थी आणि पालक नाराज


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं पत्रकार परीषद घेत दहावीचा निकाल आज जाहीर केला. दुपारी एक वाजता मुलांना निकाल कळणार होता. मात्र ,बोर्डाने दिलेल्या वेबसाईट ओपन होत नसल्याने निकाल मिळण्यास उशीर झाला. तब्बल एक दोन  तास उलटूनही निकाल मिळाला नाही त्यामुळे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची उत्सुक होते, परंतू त्यांचा हिरमोड झाला.



सोशल मीडियावर नाराजी व्यक्त


दहावीच्या निकालाच्या दोन्ही साईट बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांची निराशा झाली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकालासाठी दोन साईट देण्यात आल्यात. .मात्र या साईट क्रॅक झाल्यामुळे अद्यापही विद्यार्थ्यांना निकाल मिळालेला नाही. निकाल काय लागला हे न कळल्याने पालकांमध्येही नाराजी आहे. यासर्व गोष्टीचा संताप अनेक विद्यार्थी व पालकांनी सोशल मीडियावर व्यक्त केला.तर काहींनी विनोद करत मिम्स टाकत मंडळाच्या कारभाराची खिल्ली उडवली.






टिप्पण्या