South Central Railway : दक्षिण मध्य रेल्वे डीआरएमची अकोल्यात तानाशाही; लोकप्रतिनिधी पत्रकारांना भेटण्यास मज्जाव, भाजपाने केला निषेध

 file photo:Akola Railway station



नीलिमा शिंगणे जगड

अकोला: दक्षिण मध्य रेल्वेचे डीआरएम आज अकोला दौऱ्यावर आले होते. मात्र, त्यांनी पत्रकार, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीच नव्हेतर लोकप्रतिनिधी सोबत चर्चा करण्यास नकार दिला. तसेच छायाचित्र काढणे व चित्रीकरण करण्यासही मज्जाव केला. अधिकारी वर्गाच्या या तानाशाहीचा विरोध भाजपच्या शिष्टमंडळाने केला असून, निषेध व्यक्त केला. 



काय घडला नेमका प्रकार


माजी केंद्रीय राज्यमंत्री अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या सूचनेवरून आज भाजपा शिष्टमंडळाने दक्षिण मध्य रेल्वे डी आर एम गजानन मालय यांची भेट घेऊन, अकोट खंडवा तसेच अकोट पूर्णा व दक्षिण भारतासाठी अकोट पासून गाड्या सुरू करण्याची मागणी केली. 




दरम्यान, रेल्वे पूलचा विस्तार करून रेल्वे स्थानक परिसरात असलेले हनुमान मंदिरा जवळील प्रवासी पुलाचा विस्तार करण्याचा,  तापडिया नगर येथील उड्डाणपूल संदर्भात दक्षिण मध्य रेल्वेची अडचण, रेल्वेच्या अकोल्यात असलेल्या जागा लक्षात घेऊन नवीन प्रकल्प सुरू करण्याबाबत प्रस्ताव आदी बाबत दक्षिण मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य व भाजपा कोषाध्यक्ष वसंत बाछुका, गिरीश जोशी, संजय जिरापुरे, एडवोकेट सुभाष ठाकूर आदीं DRM यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते. मात्र, DRM यांनी सुरवातीला चर्चा करण्यास नकार दिला. मात्र, खासदार धोत्रे यांनी कानउघडणी केल्या नंतर ते चर्चेसाठी तयार झाले. यावेळी शिष्टमंडळाने चर्चेत भाग घेऊन रेल्वेच्या अनेक समस्या दूर करण्यासंबंधी चर्चा केली.



पत्रकारांनाही मज्जाव

पत्रकार, विविध सामाजिक संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांना देखील DRM यांनी भेटण्यापासून मज्जाव करण्याचा प्रकारामुळे भाजपा शिष्टमंडळाने निषेध व्यक्त केला. अशा प्रकारची तानाशाही अधिकारी करत असेल तर यासंदर्भात रेल्वे मंत्रालयात तक्रार करण्यात येईल, अशी चेतावणी यावेळी भाजप पदाधिकारी यांनी दिली. अकोल्यात दौऱ्यावर आलेल्या डी आर एम पत्रकारांना भेटण्यास तसेच प्रेस फोटोग्राफर यांना फोटो काढण्यासाठी तसेच  इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडिया  चैनल प्रतिनिधींना चित्रीकरण करण्यास  मज्जाव केला. यावेळी अकोल्याच्या संदर्भात विविध सामाजिक संघटना, रेल्वे प्रवासी संघटना,लोकप्रतिनिधी यांनी भेट व चर्चा करण्यास वेळ मागितल्यावरही डी आर एम यांनी मनाई केली. 



यानंतर यासंदर्भात खासदार संजय धोत्रे यांच्याकडे  तक्रार करण्यात आली. धोत्रे यांनी त्वरित डीआरएम यांच्याशी चर्चा करून भाजपा शिष्टमंडळाला समस्या मांडण्याची वेळ दिली. यावेळी अनेक प्रश्न मांडून भाजपा शिष्टमंडळाने चर्चा केली. 



चर्चेतील मुद्दे


अकोट खंडवा रेल्वे मार्गातील अडथळा संदर्भात चर्चा केल्यावर, वन विभाग व वन प्राणी संरक्षण कार्यकर्ते कोर्टात गेल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. या संदर्भात जनजागृती करून या रस्त्याची अडचणी संदर्भात नागरिकांनी सहकार्य करावे, रेल्वे बोर्ड  ब्रॉडगेज काम रेल्वे लाईनचे काम करण्यासाठी सज्ज आहे. अकोल्यात रेल्वेची जागा मोठ्या प्रमाणावर असून या संदर्भात माहिती संकलन करून रेल्वे विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल तसेच नवीन रेल्वेगाड्या संदर्भात विचार करून निर्णय घेऊ, आकोट रेल्वे स्टेशन वरून गाड्या सुरू केल्यास अमरावती बुलढाणा अकोला जिल्ह्यातील नागरिकांना सुविधा प्राप्त होऊन शेतकऱ्यांचा माल दक्षिण भारत उत्तर भारतात जाण्यास मदत होईल, आदिवासी तसेच शेतकऱ्यांना लाभदायक होऊ शकतो. 



माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांची सूचना भाजपा शिष्टमंडळाने प्रभावीपणे मांडली. मेमो रेल्वे पूर्ण पर्यंत तसेच अकोट पासून दक्षिण उत्तर भारताकडे रेल्वे सुरू करण्यात यावी जेणेकरून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होईल. फळबाग तसेच पान उत्पादन प्रसिद्ध आहे. तसेच व्यापार क्षेत्रासाठी सुद्धा हिवरखेड, अकोट, अंजनगाव, संग्रामपूर, मेळघाट, तेल्हारा जळगाव जामोद, अचलपूर या भागातील व्यापारी शेतकऱ्यांना व प्रवाशांना याचा लाभ होईल, अशी मागणी यावेळी वसंत बाछुका यांच्या नेतृत्वात भाजपा शिष्टमंडळाने केली आहे

टिप्पण्या