Road Accident: काळ आला होता,पण वेळ आली नव्हती; कार पलटी होवूनही बाळासह पाचजण सुखरुप

Five people, including the baby, were safe despite the car overturning (photo by Deepak Sadafale)





अकोला: रात्री दोन वाजताच्या सुमारास 17 महिन्याच्या बाळाला अकोला येथे हाॅस्पिटलला घेऊन येत असतांना कारंजा रोडवर पिंजर नजिक डुक्कर आडवे गेल्याने कार पलटी होऊन अपघात झाला. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून पाचही जण या अपघातातून सुखरुप आहेत. 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती',असेच या अपघातनंतर बघेकाऱ्यांनी म्हंटले.




*एकाच काॅलवर जिवरक्षक दीपक सदाफळे रात्री 2:30 वाजता दहा मिनटात घटनास्थळी पोहचुन बाळाला 45 मिनिटांतच अकोला येथे हाॅस्पिटल मध्ये दाखल केले.



*मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांची कार्यतत्परतेला सलाम



घटनाक्रम


28 जुलै रोजी रात्री 2:30 वाजता पिंजर येथील आशिष मानकर याने जिवरक्षक दीपक सदाफळे यांना फोनवरून माहिती दिली की, "माझ्या मित्राची गाडी कारंजा रोडवर पलटी होऊन अपघात झाला आहे."  माहिती मिळताच पथक प्रमुख दीपक सदाफळे  दहा मिनटातच घटनास्थळी पोहचले. घटना पाहिली आणि अपघात ग्रस्तांची विचारपुस केली. 



धानोरा ताथोड ता.कारंजा जिल्हा वाशिम येथील रहिवासी असलेले कुटुंब आपल्या 17 महिन्याच्या बाळाला कारंजा येथील खासगी हाॅस्पिटल मधून डाॅक्टरांच्या सांगण्यानुसार अकोला येथे तात्काळ घेऊन जात होते. घरच्या कारने कारंजावरुन अकोलाकडे जात असतांना पिंजर नजिक टर्निंग पॉईंटवर डुक्कर आडवे गेल्याने या अपघातात कार पलटी झाली.



दैव बलवत्तर की, या अपघात मधील सर्वचजण सुखरुप आहेत. कुणालाही जराशीही खरोच सुद्धा झाली नाही, हे विशेष. यानंतर क्षणाचाही विलंब न करता जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी आपल्या गाडी मध्ये बाळासह आई वडील आणि आजोबांना घेऊन अवघ्या 45 मिनिटांतच अकोला येथे हाॅस्पिटल मध्ये दाखल केले. आता बाळही सुखरुप असल्याची माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा