rescue operation: Washim: तुडुंब भरलेल्या विहरीत पोहण्यासाठी गेलेल्या इसमाचा अखेर मृतदेह सापडला; संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाची धाडसी कामगिरी


Forty feet deep water bodies were found by the rescue team in an hour.


 


अकोला: आपल्या मुलांसह पोहण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत एका इसमाने उडी मारली. मात्र, परत वरती न आल्याने मुलांनी ओरडा करीत गावकऱ्यांना बोलाविले. गावकऱ्यांनी शोध घेतला, परंतु यश आले नाही. शेवटी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने आज  धाडसी कामगिरी करून एका तासात 40 फूट खोल पाण्यातून मृतदेह बाहेर काढला.




घटनास्थळ: गीवा कुटे ता.मालेगाव जिल्हा वाशिम.




असा आहे घटनाक्रम 


11 जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास प्रकाश गोरसिंग चव्हाण वय (30) रा.मेडशी ता.मालेगाव जिल्हा वाशिम येथील रहिवासी असुन प्रकाश चव्हाण हे आपल्या पत्नीला घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील गिवा कुटे येथे आले होते. काल दुपारी गावा पासुन एक की.मी. दुर असलेल्या सास-याच्या शेतातील विहीरीत आपल्या तीन मुलांना घेऊन पोहण्याचा आनंद घेण्यासाठी व आंघोळीसाठी गेले होते. यावेळी प्रकाश चव्हाण यांनी विहीरीत उडी घेतली. परंतु ते वर आलेच नाहीत. लगेच मुलांनी गावाकडे धाव घेऊन आपबिती सांगितली. तेव्हा गावकरी शेताकडे धावून आले. कालपासुन गावक-यांनी प्रयत्न केला. परंतु विहीर पाण्याने भरलेली असल्यामुळे त्यात 40 फुट खोल पाणी असल्याने काहीच ईलाज चालत नव्हता. 




शेवटी मालेगावचे तहसीलदार रवी काळे यांनी आज सकाळी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले. लगेच आज सकाळी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनची संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयुर सळेदार, अतुल उमाळे, ऋषीकेश तायडे, ज्ञानेश्वर वेरुळकार,मयुर कळसकार, अक्षय ठाकरे यांना शोध व बचाव साहीत्यासह घटनास्थळी पाठविले. या टीम ने API अजिनाथ मोरे यांच्या आदेशाने सर्च ऑपरेशन चालु केले असता, एका तासात मृतदेह शोधुन बाहेर काढला.




यावेळी जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनचे ए.पी.आय.अजिनाथ मोरे, पोलीस कर्म चारी पंडीत, राठोड, खान,एनपीसी घुगे, गीवा कुटे गावचे सरपंच तसेच गांवकरी व नातेवाईक हजर होते, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.

टिप्पण्या