- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
If no action is taken against the criminal police, the farmers' association will lock the police station
अकोट: तक्रारीची पोच मागितली म्हणून शेतकरी संघटनेच्या माजी जिल्हाप्रमुखांना मारहाण करणाऱ्या पोलिसावर कारवाई न केल्यास शेतकरी संघटना दैठणा पोलीस स्टेशनला कुलूप ठोकणार असल्याची माहिती एका निवेदनातून उपविभागीय अधिकारी अकोट आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना शेतकरी संघटना अकोट व तेल्हारा यांच्या वतीने देण्यात आली.
या आंदोलना मध्ये तालुका अकोट व तेल्हारा मधून शेतकरी सामील होणार आहेत.
निवेदनात परभणी येथील दैठणा पोलीस ठाण्यातील कर्मचारी बळीराम मुंडे याने शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष व गावातील तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष माधव शिंदे यांना विनाकारण शिवीगाळ करत मारहाण केली आहे.पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीची पोहोच देण्याची विनंती केल्या असता, अनेक लोकांसमोर मारहाण केली आहे.
23 जून 2021 घडलेल्या या प्रकाराची तक्रार लगेचच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असून मग्रूर पोलिसावर कारवाई करण्याची विनंती केली आहे. परंतु आजतागायत पोलीस बळीराम मुंडे (बक्कल क्र.825) यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही; त्याने केलेल्या गुन्हाबद्दल मुंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
4 जुलै पर्यंत पोलीस बळीराम मुंडे यांच्यावर कारवाई न झाल्यास, शेतकरी संघटनेच्या वतीने दैठणा (ता. जी. परभणी) येथील पोलीस स्टेशनला कुलूप ठोकण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. व या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अकोट व तेल्हारा तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दैठणा (ता. जी.परभणी) येथे 5 जुलै रोजी जाणार आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन देताना शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख (माहिती व तंत्रज्ञान आघाडी) लक्ष्मीकांत कौठकर, माजी जिल्हा प्रमुख सतीश देशमुख,दिनेश देऊळकार, गोपाल निमकर्डे, अजित कळसकर, दिनेश गिर्हे, मोहन खिरोडकर आदी उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा