Omkareshwar:Akola:crime news: ओंकारेश्वरला गेलेल्या अकोल्यातील जोशी दाम्पत्याला पिस्तुलच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न: सतर्कतेमुळे वाचले प्राण, आरोपी पोलिसांच्या ताब्यात


now three accused in police custody




ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: राजस्थानी ब्राह्मण समाजाचे युवा नेते, श्रीरामनवमी शोभायात्रा समितीचे सक्रीय पदाधिकारी नितीन जोशी यांना ओमकारेश्वर (मध्यप्रदेश) जवळ लुटण्याचा  होऊन त्यांच्या सतर्कतेमुळे तीन आरोपींना अटक करण्यास पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.



घटनाक्रम

                    जोशी दाम्पत्य


श्रीरामनवमी शोभायात्रा समितीचे सक्रीय पदाधिकारी नितीन जोशी त्यांच्या पत्नी सौभाग्यवती चंचल जोशी व त्यांचे मित्र श्‍याम बिहारी शर्मा अकोल्यातून ओमकारेश्वर येथे दर्शनाला गेले होते. दर्शन करून परत येत असताना शिव कोठी परिसरात चार युवकांनी त्यांची गाडीचा (MH 30 Z 0763) पाठलाग करत  मागचा चाक पंक्चर झाला, असे म्हणून गाडी थांबवली. बंदूक व चाकूचा धाक दाखवून जोशी यांची सोन्याची चेन हिसकावून घेतली. त्यानंतर हल्लेखोरांनी आपला मोर्चा चंचल जोशी यांच्याकडे वळविला. त्यांचे जवळील दागिने पिस्तुलचा धाक दाखवत लुटण्याचा प्रकार सुरू केल्यावर नितीन जोशी यांनी प्रतिकार केला. दरम्यान चंचल जोशी यांनी आरोपीच्या हातात असलेली पिस्तुल मोठ्या हिमतीने व संधी साधत खाली पाडली. यानंतर आरोपी मोटारसायकल वरून पळून गेले. मात्र, जोशी यांनी त्यांचा पाठलाग केला. दरम्यान अन्य यात्रेकरूना याबाबत सांगितले.यात्रेकरूंचे देखील सहकार्य केले.अखेर आरोपींना पकडण्यात यश मिळाले. दरम्यान शर्मा यांनी ठाणेदार शिवम जरामे यांच्याशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने येवून आरोपींना ताब्यात घेतले.



आरोपी कडून पिस्तूल जप्त


पोलिसांनी एका आरोपीकडून पिस्तोल जप्त केली. पंधरा मिनिटात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. सध्या एक आरोपी फरार आहे. नितीन जोशी यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला व आरोपींना अटक करण्यास ओमकारेश्वर पोलिसांना यश मिळाले आहे. प्रबुद्ध गुजर, अभिषेक राजपूत, सुरेश नायक (रा. हरदा) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.



नितीन जोशी यांना कोणतीही इजा झाली नाही, हे प्रभू रामचंद्राची कृपा तसेच नर्मदा मातेची कृपा असल्याच्या भावना जोशी यांनी व्यक्त केल्या.  



या कार्यात तेथील सागर शर्मा तसेच अकोलाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. 15 ग्राम सोन्याची चैन लुटून पळून गेलेल्या आरोपीला लवकरच पोलीस अटक करून जोशी यांना मुद्देमाल परत करणार आहे. पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे व यात्रेकरूंच्या सहकार्याने आरोपींना अटक करण्यास मदत मिळाली. सौभाग्यवती चंचल जोशी यांच्या कार्यतत्परता व त्यांच्या हिमती मुळे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. याबद्दल जोशी  दांपत्याचे अभिनंदन ओमकारेश्वर पोलिस विभागाने केले. अकोल्यातील जोशी दाम्पत्य व शर्मा यांनी दाखवलेल्या हिमतीमुळे या यात्रेकरूंना लुटणाऱ्या टोळ्यांना जबर चाप बसणार असल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे.

टिप्पण्या