- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Milk price hike: सामान्यांचे बजेट अधिक कोलमडणार; पेट्रोल डिझेल पाठोपाठ दूधही महागलं, अमूल,गोकुळ नंतर मदर डेअरीने केली भाववाढ
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
नवी दिल्ली: कोरोना काळात सामान्यांना महागाईचा अधिकच फटका बसत आहे. पेट्रोल-डिझेल,अन्नधान्य, भाजीपाल्याचे दर सातत्याने वाढत आहेत. आता दुधाची देखील यामध्ये भर पडली आहे. एक जुलैपासून अमूलचे दूध 2 रुपयांनी महागलं आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये नवे दर लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर गोकुळ आणि आता मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. मात्र मदर डेअरीने फक्त दिल्ली आणि एनसीआरमध्येच दरवाढ केली आहे. त्यामुळे इतर ठिकाणच्या ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
कंपनीलाही महागाईचा सामना करावा लागतो
file photo
मदर डेअरीचे दूध खरेदी करताना दिल्ली आणि एनसीआर मधील ग्राहकांना आता दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. दुधाचे वाढीव दर हे उद्या 11 जुलै पासून लागू करण्यात आले आहेत. मदर डेअरीने याआधी 2019 मध्ये दुधाच्या दरांमध्ये वाढ केली होती. सर्व प्रकारच्या दूधावर ही दरवाढ लागू असणार आहे, असे कंपनीने पत्रकात म्हटलं आहे. गेल्या वर्षभरात महागाई प्रचंड वाढली असून, कंपनीलाही महागाईचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीमुळे दूध उत्पादनावरही परिणाम झाला असल्याचे कंपनीने सांगितले आहे. दिल्ली-एनसीआर मध्ये एक लिटर क्रीम दूध 55 रुपयांऐवजी 57 रुपयांना मिळणार आहे. टोन्ड दूधाचे दरही 45 रुपयांवरून 47 रुपये झाले आहेत.
अमूलच्या सर्व उत्पादनांच्या किमतीत वाढ
file photo
अमूलच्या सर्व उत्पादनांच्या किमतीत वाढ झाली आहे. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी-स्पेशल, अमूल स्लिम अँड ट्रिम यांच्या किमतीत लिटरमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे. दिल्ली, एनसीआर, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल सह इतर सर्वच राज्यांमध्ये नवे दर लागू झाले आहेत. जवळपास दीड वर्षांनी अमूलकडून उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. नवे दर लागू झाल्यानंतर अमूल गोल्डची किंमत 58 रुपये प्रति लीटर झाली आहे.
गोकुळ दूध संघाने केली दरवाढची घोषणा
file photo
गोकुळ दूध संघाने दुधाच्या दरात वाढ करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. पत्रकार परिषदेला हसन मुश्रीफ उपस्थित होते. गोकुळ दूध संघाने दूध खरेदी दरात वाढ केली आहे. म्हशीच्या दुधाला 2 रुपये तर गायीच्या दुधाला 1 रुपयांची वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दूध खरेदी दरवाढ 11 जुलैपासून लागू होणार असून, दूध खरेदी दरवाढीमूळे दूध उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य भागांत दूध विक्री दरात वाढ करण्यात येत असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.
दुधाचेही भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हतबल झाला असून, दूध व दुग्धजन्य पदार्थ रोजच्या आहारातून वर्ज्य करावे की काय,असा प्रश्न निर्माण त्यांच्या समोर उभा झाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा