Indian Railway: Akola Junction: अकोला-अकोट रेल्वे मार्गाचे शुभारंभ करण्यासाठी रेल्वेमंत्री अकोल्यात येणार?; विदर्भ यात्री संघाने पाठविले निमंत्रण पत्र

Railway Minister to visit Akola to launch Akola-Akot railway line?  Invitation letter sent by Vidarbha Yatri Sangh (file photo)




ठळक मुद्दा

अकोला -अकोट रेल्वे मार्गाचे शुभारंभ व अन्य विकास कार्य व सुविधांचे सुरुवात करण्यासाठी पत्रात केली विनंती



अकोला: नवीन नियुक्त झालेले रेल्वेमंत्री डॉ अश्विनी वैष्णव ,रेल्वे राज्यमंत्री दर्शना विक्रम जरदोष व रावसाहेब दानवे पाटील या तिघांना राज राजेश्वर नगरी अकोला येण्याचे निमंत्रण विदर्भ यात्री संघाने पाठविले आहे. 



अकोला ते अकोट या नुकतेच ब्रॉडगेज झालेले रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यास निमंत्रण पत्रात लिहिले आहे. या मार्गाचे सी आर एस झाले असून त्याला 27 जुलै 2020 रोजी गाड्या सुरू करण्याची हिरवी झेंडी देण्यात आली आहे .तसेच अकोला ते अकोट लोकल गाडी ,अकोट ते काचीगुडा पॅसेंजर (गेज परिवर्तना अगोदर दोन पॅसेंजर अजमेर -काचीगुडा दरम्यान धावत होत्या ) अकोट ते औरंगाबाद इंटरसिटी ,अकोट ते सुरत इंटरसिटी19003/19004 बांद्रा टर्मिनस -भुसावळ खानदेश एक्सप्रेसचा विस्तार नांदेड पर्यंत करून त्याला मराठवाडा खानदेश एक्सप्रेस असे चालवणे.


11025/11026 पुणे -भुसावळ हुतात्मा एक्सप्रेसचा अकोट पर्यंत विस्तार, 22865 /22866 एल टी टी -पुरी एक्सप्रेस या गाडीला दोन मिनिटाचा अकोला येथे थांबा देण्यात यावा.


डाबकी रोड ओवर ब्रिज व न्यू तापडिया नगर रोड वर ब्रिज यांचे देखील शुभारंभ करण्यात यावे.  


                      

भारतीय रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्याच्या दृष्टीने खामगाव ते जालना नवीन रेल्वे मार्ग, मुर्तीजापुर -अचलपूर , मुर्तीजापुर -यवतमाळ या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन कार्याचे शुभारंभ सुद्धा आपल्या हातून करण्यात यावे, असे अनुरोध त्यांना पत्राद्वारे करण्यात आले आहे. 



अकोला हे मध्य व दक्षिण मध्य रेल्वेचा महत्वपूर्ण मोठी कमाई देणारा व देशाच्या मध्यंतरी असलेला असा जंक्शन आहे आपण राजराजेश्वर नगरी अकोला येथे आगमन करून अनेक प्रलंबित कार्यांना चालना देणार अशी खात्री एका पत्रकाद्वारे संघाचे अध्यक्ष डॉ. रवि के आलिमचंदानी, अशोक अग्रवाल , दीप मनवानी, अभि. विजय खंडेलवाल , डॉ. गद्रे, डॉ. कुलकर्णी , डॉ. दुष्यंत , राजू अकोटकर, मास्टर लवेश इत्यादींनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या