Income tax: इलेक्ट्रॉनिक पद्धतीने विवरणपत्र 15 सीए/15 सीबी सादर करायला सीबीडीटीने दिली आणखी मुदतवाढ


CBDT granted further extension to submit Statement 15CA / 15CB electronically (file फोटो)




 


नवी दिल्ली: आयकर कायदा, 1961 नुसार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फॉर्म 15  सीए/15 सीबी सादर करणे आवश्यक आहे. सध्या करदाते कोणत्याही परदेशी मिळकतीसाठी अधिकृत डीलरकडे प्रत सादर करण्यापूर्वी ई-फाइलिंग पोर्टलवर सनदी लेखापालाने दिलेल्या फॉर्म 15 सीबी प्रमाणपत्रसह किंवा जिथे लागू असेल त्यानुसार फॉर्म 15 सीए अपलोड करतात.


इलेक्ट्रॉनिक पद्धतीने www.incometax.gov.in  या पोर्टलवर फॉर्म 15 सीए / 15 सीबी सादर करताना करदात्यांना आलेल्या अडचणी लक्षात घेता यापूर्वी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ(The Central Board of Direct Taxes) (सीबीडीटी) ने निर्णय घेतला होता की करदाता 15 जुलै 2021 पर्यंत फॉर्म 15 सीए / 15 सीबी अधिकृत डीलरकडे प्रत्यक्ष सादर करू शकतात.


आता ही मुदत 15 ऑगस्ट, 2021 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अर्थ मंत्रालयाने कळविले आहे.




या निर्णयानुसार, करदाता आता 15 ऑगस्ट, 2021 पर्यंत अधिकृत डीलरकडे छापील स्वरूपात नमूद केलेले फॉर्म सादर करु शकतात. अधिकृत डीलरना  परदेशी मिळकतीच्या उद्देशाने 15 ऑगस्ट, 2021 पर्यंत असे अर्ज स्वीकारण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नवीन ई-फाईलिंग पोर्टलवर कागदपत्र ओळख क्रमांक तयार करण्याच्या उद्देशाने हे फॉर्म नंतरच्या तारखेला अपलोड करण्यासाठी सुविधा प्रदान केली जाईल,असे देखील अर्थ मंत्रालयाने म्हंटले आहे.

टिप्पण्या