Covid third wave: कोविडची तिसरी लाट थोपविण्यासाठी अकोला होताहे सज्ज; जुलै महिना अखेर पर्यंत ऑक्सिजन प्लांट होणार पूर्ण





अकोला: जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन पाहणी केली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पूर्व तयारीचा भाग म्हणून त्यांनी ही पाहणी केली. तसेच ऑक्सिजन उपलब्धता व पुरवठा याबाबतही आढावा घेतला.


 


यावेळी त्यांचे समवेत निवासी उप जिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. आडे, अन्न औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक मेटकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.



पीपीई किट परिधान करून जिल्हाधिकारी यांची कोविड कक्षात ही भेट 

यावेळी जिल्हाधिकारी अरोरा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात उभारणी होत असलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या कामाची पाहणी केली. तसेच पीपीई किट परिधान करून कोविड कक्षात ही भेट दिली. जुलै महिना अखेर पर्यंत ऑक्सिजन प्लांट पूर्ण करण्यात यावा,असे निर्देश दिले.  यावेळी त्यांनी सुरश्री उद्योग व माऊली उद्योग या ऑक्सिजन प्लांटलाही भेट दिली. जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने  खाजगी रुग्णालयात ही ऑक्सिजनची पूर्ण क्षमतेने उपलब्धता राहील, याबाबत दक्षता बाळगण्याचे निर्देश त्यांनी दिले.



कोरोना अलर्ट

आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 336 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 329 अहवाल निगेटीव्ह तर सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. दरम्यान तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.


त्याच प्रमाणे काल (दि.20) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57731(43151+14403+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर सात + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह सात.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 302078 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 298538 फेरतपासणीचे 397 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3143 नमुने होते. आजपर्यंत एकूण 301946 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 258795 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


सात पॉझिटिव्ह


आज  दिवसभरात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात सात पुरुषाचा  समावेश आहे. त्यात  बार्शीटाकली-दोन, अकोला मनपा क्षेत्रातील -पाच, दरम्यान काल (दि.20) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांत शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.


तीन जणांना डिस्चार्ज


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.


47 जणांवर उपचार सुरु


जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57731(43151+14403+177) आहे. त्यात  1133 मृत झाले आहेत. तर 56551 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 47 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.



गर्भवती महिलांनी लस घ्यावी- डॉ. राजकुमार चव्हाण


कोरोना विषाणुचा प्रतिबंध करण्यासाठी त्रिसुत्रीय नियमासह कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करणे अत्यावश्यक आहे. आज जिल्हा स्त्री रुगणालय येथे गर्भवती महिला व स्त्रियांसाठी कोविड लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. गर्भवती महिलांना कोरोना विषाणुपासून रक्षण करण्यासाठी लसीकरण अत्यंत प्रभावीशाली माध्यम असून जास्तीत जास्त गर्भवती महिलांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा,असे आवाहन आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले.


गर्भवती महिला व सर्व स्त्रियांसाठी कोव्हॅक्सीन लसीकरणाचे आयोजन जिल्हा स्त्री रुग्णालयात करण्यात आले होते. यावेळी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसू, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अस्मिता पाठक, डॉ. अनुप चौधरी आदि उपस्थित होते.




गर्भवती मातांसाठी लसीकरण

 

मोहिमेअंतर्गत 41 गर्भवती महिला व दोन स्त्रिया असे एकूण 43 महिलांना कोव्हॅक्सीनचा पहिला डोस देण्यात आला. गर्भवती महिला व सर्व स्त्रियांकरीता लसीकरण मोहिम उपलब्धतेनुसार अविरत चालु राहणार आहे. लसीकरणाकरीता  माता बाल संगोपन कार्ड व आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. तरी सर्व महिलांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा,असे आवाहन स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल यांनीही केले.




उद्या दिनांक 22/07/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध आहे


*फक्त गर्भवती महिला व सर्व स्त्रियांसाठी कोविड लसीकरण राखीव सत्र* 


जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे  महिलांसाठी कोविड लसीकरणा  उद्या दिनांक 22/ 7 /2021

रोजी वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत

COVAXIN लसीचे प्रथम व द्वितीय डोस गर्भवती मातांसाठी

जिल्हा स्त्री  रुग्णालय अकोला(Lady Harding) येथे

100  डोस कूपन पद्धतीने चालू राहील



1)आर के टी आयुर्वेदिक कॉलेज 

2)नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ


वरील नागरी आरोग्य केंद्रांवर वय

 18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covishield (* ऑनलाइन अपॉइंटमेंट 50द्वीतीय डोस) [ कूपन  100 द्वीतीय डोस ]साठी

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 01 या वेळेत उपलब्ध राहील.

 उपलब्ध आहे. *प्रथम डोस कूपन व अपॉइंटमेंट उद्या कविशिल्ड करिता उपलब्ध नाही*




 *सूचना* :

उर्वरित बाकी लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्यामुळे सर्व केंद्र बंद राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.


अकोला महानगरपालिका अकोला

टिप्पण्या