Coronavirus: Vaccination: Akola: आज दिवसभरात 8 नवे पॉझिटिव्ह;एका रुग्णाचा मृत्यू (जाणून घ्या उद्याचा लसीकरण कार्यक्रम)

                                           file pic





अकोला:  आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ५०६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ५०१ अहवाल निगेटीव्ह तर पाच अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.


त्याच प्रमाणे काल (दि.१२) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57697(43126+14394+177)  झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.



आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर पाच + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी तीन = एकूण पॉझिटीव्ह आठ.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २९८५२४ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे २९५००० फेरतपासणीचे ३९७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१२७ नमुने होते. आजपर्यंत एकूण २९८४५१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २५५३२५ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.




पाच पॉझिटीव्ह


आज  दिवसभरात  पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व दोन पुरुषाचा समावेश आहे.


त्यात तालुकानिहाय पुढील प्रमाणे- मूर्तिजापूर-एक, बाळापूर-दोन, अकोला मनपा क्षेत्र-दोन, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.


एकाचा मृत्यू


आज दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण तापडिया नगर, अकोला येथील ३३ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१२ जुलै रोजी दाखल केले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.


पाच जणांना डिस्चार्ज


दरम्यान आज दुपारनंतर वैद्यकीय महाविद्यालयातील दोन, उपजिल्हा रुग्णालय येथील एक, ओझोन येथील एक, सोनोने हॉस्पिटल येथील एक, असे एकूण पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.


45 जणांवर उपचार सुरु


जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57697(43126+14394+177)आहे. त्यात  1131 मृत झाले आहेत. तर 56521 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 45 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.




उद्या दिनांक 14/07/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध आहे.


1) भरतीया हॉस्पिटल

2) आर के टी आयुर्वेदिक कॉलेज 

3) DHW लेडी हार्डिंग

4) नागरी आरोग्य केंद्र खदान (शाळा क्रमांक 16 आदर्श कॉलनी)

5) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प (खडकी)

6) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड


वरील नागरी आरोग्य केंद्रांवर वय 18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covishield* 

ऑनलाइन अपॉइंटमेंट 100 प्रथम डोस 100 द्वीतीय डोस) [कूपन 50 द्वीतीय डोस] साठी

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.

  *प्रथम डोस साठी कूपन उपलब्ध राहणार नाही.*



1) Pkv ( पंजाबराव कृषी विद्यापीठ) COVISHIELD

ऑनलाइन अपॉइंटमेंट 50 प्रथम डोस 

*महाबीज कर्मचऱ्यांसाठी* 

[कूपन 150प्रथम डोस 50 द्वीतीय डोस] साठी

पद्धतीने सकाळी 10  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.




1) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ

2) नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर मनपा क्रमांक 22 नंबर शाळा

3) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

4) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी

5) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर (आयुर्वेदिक दवाखाना)


येथे वय 18+ वरील नागरिकांसाठी *Covaxin* 

[ऑनलाईन अपॉइंटमेंट

100 प्रथम तथा 20 द्वितीय डोस]

{कूपन 100 प्रथम तथा 20 द्वितीय डोस} पद्धतीने सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत उपलब्ध राहील.


ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील


 

अकोला महानगरपालिका अकोला.


टिप्पण्या