Coronavirus update:vaccination: अकोलाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल आरटीपीसीआरचे अहवालात आज ‘शून्य’ पॉझिटीव्ह





अकोला: मागील दीड वर्षपासून अकोलावासी कोरोनाच्या सावटाखाली जगत आहेत. मात्र, आता कोरोना विषाणूपासून मुक्तता होण्याचे चिन्ह दिसत आहे. आज आरटीपीसीआर चाचणीत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. काल रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर सध्या ५४ जणांवर उपचार सुरु आहेत.



आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ३१० अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३१० अहवाल निगेटीव्ह तर कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.




त्याच प्रमाणे काल (दि.२८) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७७५९(४३१७६+१४४०६+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.




आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शून्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह एक.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३०४२५९ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३००७१७  फेरतपासणीचे ३९७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१४५ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३०४१४६ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २६०९७० आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.




‘शून्य’ पॉझिटिव्ह


आज आरटीपीसीआर चाचण्यांचा दिवसभरात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. दरम्यान काल (दि.२८) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, त्याची नोंद एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे, याची नोंद घ्यावी.




५४ जणांवर उपचार सुरु


जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७७५९(४३१७६+१४४०६+१७७) आहे. त्यात ११३४ मृत झाले आहेत. तर ५६५७१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ५४ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.



उद्याचे लसीकरण कार्यक्रम


उद्या दिनांक 30/07/2021 रोजी 

1) नागरी आरोग्य केंद्र  खदान  (शाळा क्रमांक 16 आदर्श कॉलनी)


18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covexin ( 50ऑनलाइन अपॉइंटमेंट  द्वितीय डोस) [ 150 कूपन द्वितीय डोस ]साठी

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 02 या वेळेत उपलब्ध राहील.

प्रथम डोस कूपन व अपॉइंटमेंट  करिता वरील सत्रांमध्ये उपलब्ध नाही

----------------------------------------



 DHW लेडी हार्डिंग


 18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covishield (* 75 ऑनलाइन अपॉइंटमेंट  द्वितीय डोस) [ 75 कूपन द्वितीय डोस ]साठी

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 02 या वेळेत उपलब्ध राहील.

 प्रथम डोस कूपन व अपॉइंटमेंट  करिता वरील सत्रांमध्ये उपलब्ध नाही 


New update


उद्या दिनांक 30/07/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध आहे


1)आर के टी आयुर्वेदिक कॉलेज 

2)कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

3)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी

4)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

5)नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर

(आयुर्वेदिक दवाखाना)

6) नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर

7)नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ

8)भरतीया हॉस्पिटल

9)नागरी आरोग्य केंद्र खदान ( शाळा क्रमांक 16 आदर्श कॉलनी) 



 18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covishield (* ऑनलाइन अपॉइंटमेंट 50 प्रथम डोस तथा 50द्वितीय डोस) [  कूपन 50 प्रथम डोस तथा 50 द्वितीय डोस ]साठी

पद्धतीने सकाळी 09.30  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.

 उपलब्ध आहे.

 

-------------------------------------

Pkv ( पंजाबराव कृषी विद्यापीठ) **Covishield* 

(200 डोस ) प्रथम  व द्वितीय मिळून सकाळी 9.30 ते दुपारी 02 या वेळेत उपलब्ध राहील.

-------------------------------------


1)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प(खडकी)


18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covaxin (* 50ऑनलाइन अपॉइंटमेंट  द्वितीय डोस) [ 150 कूपन द्वितीय डोस ]साठी

पद्धतीने सकाळी 9.30  ते दुपारी 02 या वेळेत उपलब्ध राहील.

  *प्रथम डोस कूपन व अपॉइंटमेंट  करिता वरील सत्रांमध्ये उपलब्ध नाही** 

-------------------------------------


ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील


*अकोला महानगरपालिका अकोला.

‌-------------------------------------




टिप्पण्या