Corona impact: latur: कोरोनामुळे कळले झाडांचे महत्व: रोकडा सावरगावात गावकऱ्यांनी केले अधिकाधिक ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड





लातूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांचे जीव गेले. त्यामुळे आता नैसर्गिक ऑक्सिजन मिळावा म्हणून लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथे अधिकाधिक ऑक्सिजन देणाऱ्या  वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. 




रोकडा सावरगाव ग्रामस्थांनी गावात जवळपास एक हजार झाडांचे वृक्षारोपण केले. वड, पिंपळ, कडूलिंब, करंज अशा देशी ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. विशेषबाब गावातील प्रत्येक व्यक्तीने एक झाड दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करण्याची शपथही घेतली आहे. याशिवाय पुढच्या वर्षी या झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्पही रोकडा सावरगावच्या ग्रामस्थांनी केला.



सह्याद्री-देवराई प्रतिष्ठानने यासाठी सर्व वृक्ष पुरविले आहेत. या अनोख्या उपक्रमासाठी अहमदपूरचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, वनविभागाचे वनपाल तेलंग, वनाधिकारी होनराव, निवृत्त पाटबंधारे अभियंता राम घोटे, निवृत्त न्यायाधीश विजयकुमार बोडके, 'नाम' चे विलास चामे, पत्रकार शशिकांत पाटील, दीपक जाधव, सुशील घोटे आदींसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.





video पाहण्यासाठी येथे क्लीक करा:कोरोनामुळे कळले झाडांचे महत्व: रोकडा सावरगावात गावकऱ्यांनी केले अधिकाधिक ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा