Chandrapur: जनरेटर मधून गॅस गळती; एकाच कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मुत्यू, दहादिवसांपूर्वी घरात झाले मंगलकार्य

Chandrapur: gas leak from generator;  Six members of the same family suffocated to death




चंद्रपूर: जनरेटर मधून झालेल्या गॅस गळतीने एकाच कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मुत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर मधील दुर्गापुरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासहित कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यु झाला. तर एकावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे कळते.



दुर्गापूर गावातील ११ केव्हीच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही घरातील जनरेटर सुरू राहिल्याने विषारी वायुगळती होऊन एकाच कुटुंबातील सहाजणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना.मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विषबाधेचा संशय व्यक्त केला आहे.





लष्कर कुटुंबात दहा दिवसांपूर्वीच लग्नकार्य झाले असल्याने घरात जनरेटर आणले होते. सोमवारी रात्रभर वीजपुरवठा खंडित झाल्याने जनरेटर सुरू होता. या जनरेटरमधूनच विषारी वायु गळती झाल्याने कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.


28 जूनला अजय लष्कर याचे लग्न झाले होते. त्याची पत्नी नववधू माधुरीला तिचे माहेर नागपूरहून सोमवारी दुपारी ४ वाजता त्याने घरी आणले होते. सकाळी घराचा दरवाजा उघडला तेव्हा माधुरी जिवंत होती. मात्र काही वेळातच तिचाही दुर्देवाने मृत्यू झाला. मृतांमध्ये मारोती लष्कर, दातू रमेश लष्कर , माधुरी अजय लष्कर, पूजा रमेश लष्कर, लखन रमेश लष्कर, कृष्णा रमेश लष्कर यांचा समावेश आहे. 


गॅस गळतीचे प्रकरण लक्षात आल्यानंतर लष्कर कुटुंबातील सातही जणांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.मात्र तिथे सहा जणांना मृत घोषित करण्यात आले. तर एका सदस्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.


 




टिप्पण्या