Akola Rain update:पावसाचा कहर: पुरग्रस्त भागातील साचलेले पाणी, घाण, कचऱ्याची युद्धस्तरवर साफसफाई करावी- मदन भरगड यांची मागणी

पुरग्रस्त भागात सर्व्हे करताना मदन भरगड



Demand for Madan Bhargad to clean up stagnant water, dirt and garbage in flood-hit areas



अकोला: पुर ओसरल्यानंतर साचलेले अनेक लोक वस्तीत साचलेले पाणी, घाण, कचऱ्याची युद्धस्तरवर साफसफाई करावी, अशी मागणी माजी महापौर मदन भरगड यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त नीमा अरोरा यांच्याकडे आज  एका निवेदन द्वारे केली आहे. साफसफाई त्वरित न झाल्यास रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे,असे देखील निवेदनात नमूद केले आहे. 



जिल्ह्यात अतिवृष्टि झाल्यामुळे मोर्णा नदीला पुर आला होता. पूराचा व पावसाचा पाणी शहराच्या अनेक वस्तीत शिरले होते. शहरात निकासिची व्यवस्था बरोबर नसल्यामुळे पाणी आजही शहराच्या अनेक वस्तित साचलेले आहे. तसेच शहरात ठीकठिकाणी कचरा व घाण पसरल्यामुळे खुप दुर्गंध येत आहे यामुळे शहरात रोगराई पसरू शकते. तसेच मागील दीड वर्षा पासून या देशाचे नागरिक कोरोना महामारीचा सामना करत आहे.अकोला शहराच्या पूरग्रस्त भागात मनपा कडून युद्धस्तरवर साफ सफाई करावी तसेच कचरा उचलावा, अशी मागणी मदन भरगड केली आहे. या संदर्भात भरगड यांनी अरोरा यांच्याशी चर्चा देखील केली. यावर तातडीने कारवाई करणार असल्याचे  आश्वासन यावेळी अरोरा यांनी दिले.



भरगड यांनी स्वतः केला सर्व्हे


पुरग्रस्तांची आस्थेने चौकशी करताना मदन भरगड


मोर्णा नदीच्या पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, याकरिता शासनाकडून केलेल्या सर्व्हे मधे नजरचुकीने किंवा सर्व्हेच्या वेळी घरी हजर नसलेले नागरिक मदती पासून वंचित राहू नये, यासाठी मदन भरगड यांनी स्वतः सर्व्हे केला.



खोलेश्वर,अनिकट, कमला नेहरू नगर ,भोलेश्वर, वीर लहूजी खोलेश्वर झोपड़पट्टी इतर भागात राहणाऱ्या काही नागरिकांचे सर्वे मधे नाव सुटले आहे. अश्या नागरिकांच्या घराचा पुनः सर्वे होऊन त्यांना आर्थिक मदत मिळावी, या करिता अशा नागरिकांच्या घरापर्यन्त जाऊन सत्य  परिस्थिति पाहुन त्यांना न्याय मिळावा, या करिता भरगड प्रयत्नशील आहेत. 




टिप्पण्या