Akola Rain live update: अकोला शहर व जिल्हाचा कारभार रामभरोसे: अतिवृष्टीमुळे नागरिक संकटात; जिल्ह्यात एकही बडे अधिकार उपस्थित नाही, दोषींवर कारवाई व्हावी-भाजपाची मागणी




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: शेतकरी, सर्वसामान्य नागरिक अतिवृष्टीमुळे संकटात सापडला असताना व संपूर्ण जिल्हा जलमय झाला असताना अमरावती येथे बैठकीसाठी जिल्हाधिकारी, प्रभारी मनपा आयुक्त, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जबाबदार अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी उपस्थित नसणे हा प्रकार निंदनिय आहे. जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भाजपा कटीबद्द असून, जनतेला मदत द्या, समस्यांचे निराकरण करा, यासाठी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. संजय धोत्रे यांच्या सूचनेवरून आपले सहकारी आ. गोवर्धन शर्मा, विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, तेजराव थोरात, आदींच्या सह निवासी जिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांचे कार्यालयात ठीया आंदोलन केले. यासंदर्भात दोषींवर कारवाई करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे, विभागीय आयुक्त पियुष सिंग यांचे सोबत थेट संपर्क साधून अकोलेकारांवर झालेला प्रकार अन्याय कारक असून समस्या निकाली काढा, अशी मागणी करून केली. 



शहरातील ४० टक्के भाग जलमय


अकोला शहरामध्ये  बुधवार २१ जुलै  रोजी सायंकाळ पासून पाउस व ढगफुटीमुळे शहरातील ४० टक्के भाग जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संदर्भात अकोला महानगर पालिकेचे महापौर व पदाधिकारी यांनी दोन महिन्यापूर्वी शहरात पावसामुळे होणारे नुकसान, आपत्कालीन व व्यवस्थे संदर्भात नियोजन करण्यासंबंधी निर्देश दिले होते. परंतु मनपा प्रशासनाने दाखल घेतली नाही. अग्निशामक विभागाकडे योग्य ती साधने नाहीत. तसेच संकटकाळात अधिकारी बैठकीचे निमित्य घेऊन बाहेरगावी गेले.अकोल्याच्या जनतेला वाऱ्यावर सोडले.  



अकोला शहर तसेच ग्रामीण भागातील जनते जानादार्नाप्रती आपले दायित्व, कर्तव्य व मतदारांचा विश्वास सार्थ करण्याच्या दृष्टीने सदैव प्रयत्नशील राहणारे जिल्हा भाजपा अध्यक्ष आ रणधीर सावरकर, आ गोवर्धन शर्मा, महापौर अर्चना मसने, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल  व लोक प्रतिनिधी यांनी रात्री ११ वाजता पासून तर सकाळ ५ वाजत पर्यंत जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाशी समन्वय साधून बचाव व मदत कार्य करीत होते. 


पावसामुळे अकोला शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे पंपिंग व्यवस्था व इतर साहित्य उपलब्ध नव्हते. तसेच चांदूर खडकी या भागात नदीच्या पात्रामध्ये अवैध बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले. 


गीता नगर, आझाद कॉलनी, अंबिका नगर, कृषी नगर, खेतान नगर, लक्ष्मी नगर, शिवसेना वसाहत, नवीन किराणा बाजार  व शहराच्या इतर भागामध्ये  ३ ते ५ फुटा पर्यत  जलाशय निर्माण झाला आहे. अनेक वाहने व घरांचे नुकसान झाले. जवळपास अकोला शहरातील १५ हजार घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  



ग्रामीण भागातील आपातापा, हातरुण, रिधोरा, खडकी, डोंगरगाव, दालंबी, व्याळा सह १०० गावांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, अशा काळात जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हाधिकारी नीमा अरोरा व उपायुक्त आवारे, जावरे सुट्टीवर गेले. त्यामुळे जिल्हा, जिल्हा परिषद व मनपा कारभार रामभरोसे आहे.  



शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे सर्वेक्षण करण्याकरिता तसेच पावसामुळे ग्रामस्थांची घरे, गुरेढोरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत. या विरोधात आज भाजपाने ठीया आंदोलन केले.



 पिकांची हानी 



जिल्ह्यात आज दिनांक २१ व २२ जुलै  रोजी मोठ्या प्रमाणात सर्वत्र अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील स्थानिक नदी नाले व मोठ्या नद्यांना प्रचंड पूर आला असून पुराचे पाणी शेतात व नागरी वस्तीत घुसल्याने मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झालेली आहे. अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला महापूर आल्याने खडकी परिसरातील सखल भागात रात्री १ वाजताच्या सुमारास पाणी घुसल्याने नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले शिवाय  त्यांना इतरत्र स्थलांतरित करावे लागले. बऱ्याच ठिकाणी घरांची पड-झड झाली तसेच घरात पाणी शिरल्याने बऱ्याच कुटुंबांचा उदरनिर्वाहाच प्रश्न निर्माण झाल्याने अशा बाधित कुटुंबांना तातडीने तात्पुरते निवारे, जीवनावश्यक साहित्य, राशन, भोजन सुविधा पुरविण्यासाठी शासनाने मदत करावी.  नदीकाठची शेती खरडून गेल्याने तसेच पाणी साचल्याने उभ्या पिकांची हानी झाली आहे. ग्रामीण भागात स्थानिक नदी/नाल्यांना पूर आल्याने तसेच अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाली आहे ज्याठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे अशा बाधित लोकांना घरकुल योजनेचा लाभ शासनाकडून देण्यात यावा. सदरच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित  शहरी व ग्रामीण भागातील लोकांना शासनाची तातडीची मदत देण्यात यावी.


शेतकरी संकटात


जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे तसेच रस्ते आणि पूल नादुरुस्त झाल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात बाधा पोहोचली आहे . सदरच्या अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने शेतकरी प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. या वर्षी खरीप हंगामात सुद्धा पावसात खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. अशा हलाखीच्या परिस्थितीत ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी दुहेरी/ तिहेरी संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांची व जमिनीच्या झालेल्या  नुकसानीचे सर्वेक्षण, ग्रामीण भागातील तसेच नागरी वस्तीतील घरांचे नुकसान या बाबत क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणेस आर्थिक नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करून आर्थिक मोबदला मिळणे बाबतचा प्रस्ताव शासनास विना विलंब सदर करावा  अशी मागणी या वेळी करून अवैध बांधकामे तोडण्यात यावी अशी मागणी या वेळी करण्यात आली. 


महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे पाहणी करावी



प्रदूषित नद्यांमुळे अकोला शहरामध्ये अतिवृष्टीमुळे जवळपास तीस टक्केच्यावर परिसर पाण्याच्या खाली आला. यासंदर्भात अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी आज सकाळपासून शहरातील विविध भागाची पाहणी केली. तातडीने आपत्ती व्यवस्थापन अतिरिक्त जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांची भेट घेऊन ताबडतोब सर्वे करून नागरिकांना दिलासा द्यावा अकोला शहरातील शिवसेना वसाहत आश्रय नगर खोलेश्वर लक्ष्मी नगर कमला नेहरू नगर खेता नगर गीता नगर रमाबाई आंबेडकर नगर रणपिसे नगर उमरी खडकी या परिसरात फार मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले आहे.


यासंदर्भात महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे पाहणी करून ताबडतोब नागरिकांना दिलासा द्यावा प्रत्येकी दहा हजार रुपयाची मदत तातडीने द्यावी, अशी मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली आहे. तसेच अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे यात यासंदर्भात सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच अकोला शहराचा विस्तार पाहता योग्य नियोजनासाठी विशेष निधी सुद्धा शासनाने द्यावा अशी मागणी आमदार शर्मा यांनी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी निवेदन देताना संतोष पांडे गिरीराज तिवारी  गिरीश जोशी आदी उपस्थित होते.


अकोला लोकसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाशीम जिल्हाधिकारी व अकोला जिल्हाधिकारी यांनी ताबडतोब सर्वे करून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आधार द्यावा अशी असे निर्देश माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिले तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाचे औचित्य साधून संकटात सापडले या सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी करावे असे आवाहन  खासदार संजय धोत्रे यांनी केले आहे. 


तात्पुरते निवारा व भोजन केंद्र सुरू करावे



शहरात 21 जुलै रोजी आलेली ढगफुटी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात रात्री नुकसान झाले या संदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर भाजपा ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा व महानगराध्यक्ष विजय अग्रवाल आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे यांच्याशी माहिती घेऊन तसेच जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची संवाद साधून खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी सरकारकडे व राज्य शासनाकडे परिस्थितीची माहिती दिलीकेंद्रीय राज्य मंत्री संजय धोत्रे यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी व मोर्णा नदीच्या महापुरामुळे अकोला शहरासह नदीकाठी असलेल्या गावातील विस्कळीत झालेल्या जनजिवनाची व शेती पिकांचा हानी बाबत प्रशासनाकडून माहिती घेऊन नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रशासनास सुचना केल्या.अकोला शहरातील खडकी, सिंधी कँम्प, शिवसेना वसाहत, कैलास टेकडी, अनिकट परीसर ईत्यादी नदी काठावरील भागातील लोकांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अशा नागरिकांसाठी तात्पुरते निवारे , भोजन, जीवनावश्यक सामुग्री व तातडीची शासकीय मदत देण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनास केल्या आहेत.  संजय धोत्रे यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे, रस्ते व पुलामुळे वाहतूक बाधित झाली आहे, अशा सर्व प्रकारच्या झालेल्या सर्व नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करून भरपाई मदतीसाठी शासनास प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना सुद्धा अकोलासह वाशीम जिल्हा प्रशासनास केल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती मधे सापडलेल्या लोकांना तातडीने सर्वतोपरी मदत करण्यासाठी जिल्ह्यातील भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वांना त्वरित मदत करण्याची विनंती केली होती.



धरणांची स्थिती

पूर्णा बॅरेज-2 (नेरधामना) दि 22/07/21 सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे बॅरेज  ची सर्व व्दारे वर उचलून ठेवण्यात आली आहेत, सकाळी  12.00 वाजता   पूर पातळी 243.50  मी असुन 12 गेट मधून पूराचे पाणी वाहत आहे पूर विसर्ग 4672.92घमीप्रसें आहे.



* दगडपारवा प्रकल्प* 

आज दि.२२/07/२०२1 रोजी सकाळी 11.30 वाजता   प्रकल्पाचे  एकूण 1 वक्रद्वारे प्रत्येकी 2.50 cm उंचीने उघडली असून नदीपात्रात एकूण  2.05 घ.मी./से एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी  सावध राहावे                

*Dagadparva project* 

22/07/2021               11.30 pm

Level - 316.60mtr

Storage -  9.77Mm3

Percentage  - 80.94%



 *दगडपारवा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष* 



 दिनांक 22/7/21

वेळ : 12.30 PM वाजता 

मोर्णा नदी 

नदी पातळी ...270.70 M.

उंची.........  2.10 M. 

विसर्ग.......  406.96 Cumecs



दिनांक 22/7/21

वेळ : 03.30 PM वाजता 

मोर्णा नदी 

नदी पातळी ...270.00 M.

उंची.........  1.40 M. 

विसर्ग.......  225.74 Cumecs


युवाराष्ट्रचे मदत कार्य

अकोला शहराच्या काही भागांत पुरा च्या पाण्याचा झालेला प्रादुर्भाव बघता व  आजचे पावसाळी वातावरण बघता काही पुरपिडीत नागरिकांना निवारा व भोजनाची गरज पडू शकते.आपल्या परिसरातील काही नागरिकांना अशी गरज पडल्यास अवश्य संपर्क करा.

जिव्हाळा वृद्ध सेवा आश्रम 

अयोध्या नगरी जवळ ,मलकापूर

अकोला येथे किमान ५० लोकांची

निवारा व भोजनाची व्यवस्था करता येईल. 


*सृजन मल्टिपर्पज फाउंडेशन*

*जन अभियान संघटना*

*युवाराष्ट्र परिवार*

संपर्क_ 9923795273- अविनाश भाऊ देशमुख, 7721841484_  डॉ.नीलेश पाटील, 97 63288870,

8803191612_  अमोल डांगे

9922442081_धनंजय मिश्रा

9372440663_ विलास ताथोड

96044443428_ दिनेश लोहोकार, 9822078455 _राजीव इटोले

टिप्पण्या