Akola Rain live update: पावसाचा कहर : अकोल्यात पावसाने धारण केले रौद्ररूप; शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. अकोल्यात बुधवार २१ जुलैच्या रात्री पावसाने दमदार हजेरी लावत रात्री १ वाजता रोद्ररुप धारण करून  शहरासह जिल्हा अक्षरश: झोडपून काढला. रात्री १ ते ३ वाजे पर्यंत झालेल्या बेकाबू पावसामुळे मोर्णेला मिळणा-या अनेक मोठ्या व लहान नाल्यात वेगाने व प्रचंड प्रमाणात येणा-या पाण्यामुळे मोर्णेला पुर आला. पूर्णा नदीने देखील आपले रूप बदलले आहे. नदी काठच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या पाऊस ओसरला असून, बचाव कार्यावर भर देण्यात येत आहे.




सकाळी मोर्णेचे पाणी दगडीपुलावरुन वाहू लागले. अतिवृष्टीमुळे मोर्णा नदीला आलेल्या महापूराने नदीकाठावरील गावात पाणी शिरले. लगतची शेतशिवार जलमय झाली.  शहरातील खडकी, कौलखेड, सिंधी कँम्प, खदान, खोलेश्वर, कमलानगर, हरीहरपेठ, गुलजारपुरा, डाबकीरोड, गडंकीसह अनेक सखोल भागातील नागरीवस्तीत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.



नागरिकांच्या घरातील सामान मोठ्या प्रमाणात नष्ट झाले. लोकांनी जीव वाचविण्यासाठी रात्र घराबाहेर काढली. पुरात अडकलेल्या सुमारे पन्नास लोकांना तातडीने बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले आहे. खडकी परिसर परिसरातील श्रद्धा नगर, सूर्या हाईट, स्मशानभूमी तसेच आरटीओ ऑफिसमागील ड्रिमलॅन्ड सिटी या परिसरात नदीचे पाणी घुसले आहे. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, नदीने पात्र बदलले. 



सकाळी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी स्वतः व त्यांच्या पुत्रांनी तसेच कार्यकर्त्यांनी नागरिकांना बोटीच्या साहायाने  घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. 



दरम्यान वीजपुरवठा खंडित करावा लागल्याने बचावकार्याला अडचणी निर्माण झाल्या होत्या. कानशिवनी येथील येथील सूर्या नाल्याला प्रचंड पूर आला असून सखल वस्तीतील घरामध्ये जवळपास ४ फूट पाणी शिरले आहे. येथील श्री हनुमान मंदिराची पायरी पुराच्या पाण्याखाली गेली आहे.



अकोला शहरातील डाबकी रोड, जुने शहर, घुसर , मोठी उमरी ,रतनलाल प्लॉट, जवाहर नगर, गोकुळ कॉलनी ,प्रसाद सोसायटी, गोइंका लेआउट, मुकुंद नगर ,आदीं भागांमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे एकच तारांबळ उडाली आहे. 



शहरातील अनेक काॅम्प्लेक्सच्या बेसमेंट  दुकानामधे पाणी साचल्याने व्यवसायीकांचे  आर्थिक नुकसान झाले आहे. हे पाणी काढण्यास बरीच कसरत करावी लागत आहे. 


महामार्ग वाहतूक खोळंबली


रात्री व्याळा ते रिधोरा दरम्यान महामार्गावर दोन फुट पाणी वाहत होते. यामुळे महामार्गावर वाहतूकीला खोळंबा निर्माण झाला आहे. महामार्गावर वाहनांची रांग लागली असुन कलाकत्ता ढाब्यात तिन फुट पाणी साचले. दरम्यान रेल्वे वाहतूकही खोळंबली. मुबंईला झालेली मुसळधार पावसामुळे अकोला कडून मुंबईकडे जाणाऱ्या चार रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या.



दरम्यान, व्याळा रिधोरा दरम्यान ढगफुटी सदृश स्थीती निर्माण झाली होती. व्याळा गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. मुसळधार पावसाने मोर्णा दूथडी भरुन वाहत आहे. विशेष म्हणजे नदीत पूर्णपणे पसरलेली जलकूंभी वाहून गेली.यामुळे डास,घाण व कचर्‍या पासून तूर्ततरी मुक्ती मिळाली आहे. नदीकाठी असलेल्या जवळपास शंभर गावाच्या शेतकऱ्याची पिके वाहून गेली. पंधरा दिवस पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल होता.




आता अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अकोला तालुकासह अकोट तालुका, बाळापुर तालुका, बार्शीटाकळी तालुका, पातुर, मेडशी ,मालेगाव या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी व सर्वसामान्य हवालदिल झाला आहे.





अकोला शहरामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अकोला महानगरांमध्ये खडकी सिंधी कॅम्प खोलेश्वर उमरी जुने शहर रणपिसे नगर हरिहर पेठ या भागात अनेक घरांमध्ये पाऊस पाणी गेल्यामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाला आहे अकोल्याच्या इतिहासात तीन तासात मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे व रात्रीची वेळ असताना अकोला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी ताबडतोब शहरातील भागाचा दौरा केला व प्रशासनाला सूचना केल्या. भाजपा नगरसेवक यांनी देखील पाहणी केली. तसेच दिल्लीहून इथून अकोला शहराची व जिल्ह्याची माहिती अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार माजी राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी घेऊन जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाला योग्य सूचना दिल्या.


सतत वेगवेगळ्या भागात आमदार रणधीर सावरकर जाऊन नागरिकांना धीर देण्याचे काम करत होते. भाजपाचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी सुद्धा या संदर्भात दखल घेऊन परिस्थितीची माहिती घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या. राज्य शासनाने यापासून झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात मदत करावी यासाठी सुद्धा जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार  सावरकर प्रयत्नशील राहणार आहे. शहराच्या विविध भागांमध्ये आमदार रणधीर सावरकर पुरा पासून बचाव करण्यासाठी पथकांना सक्रिय केले आहे व त्या भागातील नागरिकांना व युवकांना आधार देण्याचे काम ते सातत्याने करीत आहे पले सहकार्‍यांसोबत व भारतीय जनता पक्षाचे त्या भागातील नगरसेवक लोक प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेण्याचे काम सतत आठ तासापासून करत आहे.



पीक वाहून गेले


नदीकाठी असलेल्या जवळपास शंभर गावाच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पूर्ण पीक वाहून गेले. यासंदर्भात सुद्धा आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा प्रशासनाला सर्वे करण्याची मागणी केली  पंधरा दिवस पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल होता त्यामुळे फार मोठे नुकसान झालेले दुबार पेरणी ची परिस्थिती अधिक ठिकाणी निर्माण झाली आणि आता अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अकोला तालुका अकोट तालुका बाळापुर तालुका बार्शी तालुका पातुर मेडशी मालेगाव या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सोबत शेतकरी सुद्धा हवालदिल झाला आहे त्याला आधार देण्यासाठी शासनाने त्वरित मदत व सर्वे करावा अशीही मागणी आमदार सावरकर यांनी केली आहे या संदर्भात संपूर्ण माहिती खासदार संजय धोत्रे यांनी दिल्लीवरुन शेतकऱ्यांची परिस्थिती जिल्ह्याची परिस्थिती जाणून घेतली.




मोर्णा नदीला महापूर आमदार रणधीर सावरकर बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल . रात्री सुमारे एक वाजता पासूनच मोरणा नदीला अतिवृष्टीमुळे महापूर आला असून नागरी वस्तीत पाणी शिरले आहे आमदार रणधीर सावरकर लोकांच्या बचावकार्यासाठी खडकीसह या  परिसरात भाजप कार्यकर्त्यांसह दाखल झाले.


मोरणा नदीला महापूर 



खडकी, कौलखेड, सिंधी कँम्प परिसरात मोर्णा नदीच्या पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरले आमदार रणधीर सावरकर यांनी रात्री १ वा. पासुनच  बचाव कार्य सुरू केले, पुरात अडकलेल्या सुमारे पन्नास लोकांना तातडीने बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले, खडकी परिसर परिसरातील श्रद्धा नगर, सूर्या हाईट, स्मशानभूमी  या परिसरात मोरणा नदीचे  पाणी घुसले आहे, पूर इतका प्रचंड आहे की, मोरणा नदीने  पात्र बदलून पुराचे पाणी या परिसरात घुसले आहे.  वीज पुरवठा खंडित करावे लागल्यामुळे बचावकार्याला अडचणी निर्माण होत आहेत, आमदार रणधीर सावरकर यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी बचावकार्यात गुंतले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे,  प्रशासनाला बचावकार्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी  तातडीच्या सूचना दिल्या आहेत.


वीजपुरवठा खंडित


अकोल्यात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे गेल्या पाच तासापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे अंधाराचा साम्राज्य निर्माण झाला आहे पाऊस सुरू असल्यामुळे वीज वितरण कंपनीला काम करता आले नाही परंतु गेल्या दोन तासापासून पाऊस बंद आहे वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांनी त्वरित वीज पुरवठा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने युद्धस्तरावर पावले उचलावी अशा सूचना अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या शहरात व जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये अचानक अतिवृष्टी झाल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे महाराष्ट्रात आघाडी सरकारची महाजनादेश  स्थापना झाली आहे. तेव्हापासून निसर्गाने कोप केला आहे गेल्या दोन वर्षात अतिवृष्टी मुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक   हैरान है जागतिक महामारी covid-19 मुळे समाजातील सर्व नागरिकांना याचा फटका बसला आहे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी सर्वसामान्य नागरिक व समाजातील सर्व स्तरावर याचा परिणाम होणार आहे यासाठी शासनाने त्वरित धोरणात्मक निर्णय घेऊन मानवतेच्या नात्याने पावले उचलावी अशी मागणी अकोला जिल्हा भाजपाने केली आहे व वीज वितरण कंपनीला आमदार सावरकर यांनी सूचना दिल्या.



आमदार सावरकरांच्या वीज वितरण कंपनीला सूचना


मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक हानी  शेताला नदीचे स्वरूप आले आहे 

दुःखाचा डोंगर शेतकऱ्यावर अक्षरशः कोसळला आहे.



आमदार गोवर्धन शर्मा शहराची पाहणी करण्यासाठी व नागरिकांना धीर देण्यासाठी सातत्याने फिरत आहे.   



श्री रामनवमी शोभायात्रा समिती व भाजपा तर्फे नागरिकांना संकटकाळात एकत्रीत राहण्याचे आवाहन करत आहे.



रामनवमी शोभायात्रा समिती पुन्हा संकट काळात नागरिकांच्या मदतीला धावून आली  21 जुलै रोजी रात्री ढग फुटी अतिवृष्टी होऊन अकोला शहरामध्ये संपूर्ण शहर जलमय झाले अशा काळात वंचित पीडित कामगार हात मजुरी करणाऱ्या नागरिकांना रामप्रसाद च्या माध्यमातून आधार देण्याचे काम या समितीचे सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी आज अकोला शहरामध्ये सहा ठिकाणी चहा नास्ता सोबत राम खिचडी प्रसाद ची व्यवस्था करून शहरात खोलेश्वर कमला नेहरू अनीकट शिवसेना वसाहत कैलास टेकडी या भागात तसेच खेतान नगर कौलखेड खडकी या भागाची पाहणी करून ताबडतोब भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी रामनवमी शोभायात्रा समितीचे पदाधिकारी यांच्यासोबत  माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात धर्म पारायण व अकोले करांच्या सुखदुःखात धावणारे कुशल नेतृत्व आमदार गोवर्धन शर्मा यांनी पाहणी करून पाच फूट पाणी असताना सुद्धा शिवसेना वसाहत नागरिकांशी संवाद साधला तसेच किराणा बाजार खोलेश्वर कमला नेहरू राधे नगर गीता नगर कैलास टेकडी खदान खडकी खेतान नगर कौलखेड या परिसराची पाहणी करून नागरिकांची संवाद साधून जिल्हाधिकारी निमा अरोरा व उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांच्याशी संवाद साधून झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात सर्वे करून नागरिकांना तातडीने मदत  द्यावा व त्यांच्या राहण्याची ताबडतोब व्यवस्था करावी अशी सूचना केली. 



अकोलेकरांनी नेहमी पुरापासून  त्रास होते आमदार गोवर्धन शर्मा यांनी दगडपारवा धरणची निर्मिती करून या संकटाला काढले परंतु भाजपा-शिवसेना युतीच्या काळात मोरणा नदी व संरक्षण भीतीच काम काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात बंद करण्यात आले त्यामुळे संकट झाले आहे या भागात या याकडे सरकारने दुर्लक्ष केले तत्कालीन जलसंधारण मंत्री स्वर्गीय महादेवराव शिवणकर व अकोल्याचे नेते गुलाबराव गावंडे असताना हे काम मंजूर झाले होते कामाला सुरुवात झाली होती परंतु दुर्भाग्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात ते काम रखडले बंद झाले.

मोरणा रिवर सरक्षण भिंत उभी राहिली असती हे संकट टळले असते. 



सहा ठिकाणी राम प्रसाद सुरू


जनतेच्या सेवेसाठी व पीडित वंचितांना मदतीसाठी सकाळपासून श्री रामनवमी शोभायात्रा समिती चे कार्यकर्ते व भाजपाचे कार्यकर्ते आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात सकाळ पासून कार्यरत आहे. कार्यकर्ते या कामात पुढाकार घेऊन रामप्रसाद  सहा ठिकाणी सुरू केला आहे




Live Update

घुंगशी ब्यारेज-दि 22/07/21 सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे ब्यारेज ची सर्व व्दारे वर उचलून ठेवण्यात आली आहेत, रात्री 3.00 वाजता पूर्णा नदीला पूर आला असून  आज सकाळी 6.00 वा  पूर पातळी 255.60 मी असुन 07 गेट मधून पूराचे पाणी वाहत आहे पूर विसर्ग 763 घमीप्रसें आहे.



दिनांक 22/7/21

वेळ : 7 वाजता 

मोर्णा नदी 

नदी पातळी ...273.55 M.

उंची.........  4.95 M. 

विसर्ग.......  1915.17 Cumecs



 Kumbhari MITank 7:00am

97.90M. 1.726mm3 100% Overflow 10cm, Discharge 5.153 cumecs



पूर्णा बॅरेज-2 (नेरधामना) दि 22/07/21 सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे बॅरेजची सर्व व्दारे वर उचलून ठेवण्यात आली आहेत, सकाळी  10.00 वाजता   पूर पातळी 241.250 मी असुन 12 गेट मधून पूराचे पाणी वाहत आहे पूर विसर्ग 2344.99 घमीप्रसें आहे.




दिनांक 22/7/21

वेळ : 10.30 AM वाजता 

मोर्णा नदी 

नदी पातळी ...271.30 M.

उंची.........  2.70 M. 

विसर्ग.......  6 07.90 Cumecs

टिप्पण्या