Akola Rain live update: पावसाचा कहर: नागपूर - मुंबई महामार्गावरील पुलाचा एक भाग अचानक खचला;आवार भिंत कोसळली, पुरात अडकलेल्या 17 लोकांना जीवनदान





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : दोन चार दिवसापासून राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली. बुधवारी रात्रीपासून सहा तास झालेल्या संततधार पावसामुळे अकोला जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागात शेती आणि जनावरांच मोठं नुकसान झालं आहे. तर गुरुवारी दुपारी निमवाडी जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा नागपूर - मुंबई मार्गावरील पुलाचा एक भाग अचानक खचला. सकाळी पुला खालून वाहणाऱ्या मोर्णा नदीला मोठा पूर आला होता.  त्यानंतर गुरुवारी दुपारी अचानक नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याकडेचा पुलाचा एक भाग कोसळला. सुदैवाने या मार्गावरील वाहतूक काही काळआधी बंद करण्यात आली होती त्यामुळे मोठी घटना टळली.


धुळे-अमरावती मार्गाचे काम येथे सुरू असून संबंधित ठेकेदाराने शंभर वर्ष अधिक जुन्या असलेल्या या पुलावर मलबा टाकून वाहतूक बंद केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर हा मलबा उचलण्यात आला होता. मात्र, गुरुवारी दुपारी पुलाचा एक भाग कोसळला. हा मार्ग आता बंद करून वाहतूक पुलाच्या एकाबाजुने वळविण्यात आली आहे.



कस्तुरीची आवार भिंत कोसळली


बुधवारी  रात्री  झालेल्या  मुसळधार  पावसामुळे गायगाव मार्गावरील कस्तुरी सामाजिक संस्थेच्या परिसरात  बांधलेल्या   दोन  आवारभिंती तीन  ठिकाणी ( अंदाजे  ७५ फूट ) पडून  परिसरात  असलेले  मटेरियल  विटा , रेती ,  गायीकरिता असलेली  कुट्टी  वाहून  गेली. परिसरात  मोठया  प्रमाणात  पाणी  घुसले.  त्यामुळे  चिखल  झाला  आहे. आवारभिंत  पडल्यामुळे  झालेला  लागत  खर्च   व  पुनर्बांधणी  साठी  येणारा  खर्च   तसेच  वाहून  गेलेली  रेती ,  चुरी  व  लेवलिंग  साठी  यापूर्वी  केलेला  खर्च याप्रमाणे   एकूण  १ ते  १.५ ( दीड ) लाख  रु.  चे  नुकसान  झाले आहे . नैसर्गिक  आपत्ती मुळे  झालेले  नुकसान  भरून  काढण्यासाठी  श्री  संत  गजानन  महाराज निश्चितच  धावून  येतील,अशी आशा भाविकांनी व्यक्त केली.  



बुधवारी रात्री 12:00 वाजता पासुन ते सकाळी 6 वाजेपर्यंत चार ठीकाणी पुरातील अडकलेल्या एकुण 17 लोकांना रेस्क्यु करुन सुखरुप वाचविले


पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाची अशीही जिगरबाजी


  

बुधवारी एकाच रात्री ढगफुटी सारख्या पाऊस पडल्याने जिकडेतिकडे पुर परीस्थिती गंभीर झाली होती अशाही परीस्थितीला सामोरे जाऊन मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या  संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक,पिंजर चे प्रमुख दीपक सदाफळे जिवरक्षक यांनी अपुरे साधन तसेच मोठे कोणतेही वाहन उपलब्द्ध नसताना छोटी कारसह आपली टीम घेऊन अतिशय कार्यतत्परता दाखवत  17 लोकांना जिवनदान दिले. 



सात तासाच्या कालावधीत दोनद नाला, आमराई नाला, खोलेश्वर स्मशानभूमी विद्रुपा नदी येथील ठीकाणी रेस्क्यु ऑपरेशन यशस्वी केले.

 

यानंतर सकाळी खडकी येथे रेस्क्यु ऑपरेशन राबवून सेठी हाईटस, श्रद्धा काॅलीनी, 30 बंगले येथील कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले.


अशा घडल्या एकाच रात्री पुरातील घटना. 



दोनद बार्शीटाकळी रोडवरील चंद्रपुर येथील कवादे फॅमिलीतील तीन लोकांना वाचविले. 


बार्शीटाकळी येथील खोलेश्वर मंदीरा समोरील विद्रुपा नदीपात्रातील असलेल्या स्मशानभूमीत अडकलेल्या आई वडील आणि मुलासह तीन लोकांना सुखरुप वाचविले. यामध्ये स्मशानभूमीत राहणारे पिराजी एल्लपा कोंडेवार वय (40),पत्नी राधाबाई पिराजी कोंडेवार वय (35) मुलगा अर्जुन पिराजी कोंडेवार वय (12) रा.बीलोली जिल्हा नांदेड यांना मोठ्या अथक प्रयत्नाने जिव धोक्यात घालुन सुखरुप बाहेर काढले. यामध्ये बार्शिटाकळी ठाणेदार श्रीरंग सनस, पिएसआय निलेश तारक यांनी तसेच राजेश कवळकार, शिवलाल विके यांनी सहकार्य केले. 



अशा एकुण 17 लोकांना रेस्क्यु केले या रेस्क्यु ऑपरेशन सक्सेस करण्यासाठी जिगरबाज जिवरक्षक पथक प्रमुख दीपक सदाफळे, त्यांचे सहकारी ऋषीकेश राखोंडे, मयुर सळेदार, विकी साटोटे, अंकुश सदाफळे, महेश साबळे, ऋतीक सदाफळे, सचीन बंड, आकाश बगाडे हे होते.



आरडीसी संजय खडसे ,अकोला एसडीओ निलेश अपार , मुर्तीजापुर एसडीओ अमरसिंह मोहीते ,बाळापुर एसडीएम पुरी,  बार्शीटाकळी तहसीलदार गजानन हामंद  हे रात्रभर संपर्कात होते, हे विशेष. या सर्वांच्या मार्गदर्शनात व सहकार्याने रेस्क्युवर ऑपरेशन यशस्वी केले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी भरीव सहकार्य केले, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.



Latest update



घुंगशी ब्यारेज-दि 23/07/21 सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे ब्यारेज ची सर्व व्दारे वर उचलून ठेवण्यात आली आहेत, दि 22/07/021 ला रात्री 3.00 वाजता पासून पूर्णा नदीला पूर आला असून  सध्यास्थितीत पूरपातळी  254.50 मी असुन 06 गेट मधून पूराचे पाणी वाहत आहे पूर विसर्ग 252.25 घमीप्रसें आहे.



 दगड पारवा प्रकल्प Date..23/07/2021

316.60MTR , 9.77MM3, 80.94 %  RF 00 MM , TRF 494 MM. ,  1 Gate open hight 2.50 cm. dis 2.05cumecs 



पूर्णा बॅरेज-2 (नेरधामना

23/07/21  सकाळी  8.00 वाजता पूर पातळी 240.50  मी असुन 12 गेट मधून पूराचे पाणी वाहत आहे पूर विसर्ग 1686.55 घमीप्रसें आहे.



टिप्पण्या