Akola city:kholeshwar road:BJP: शहरातील रस्त्यांचे थांबलेले काम पुन्हा झाले सुरू; आमदार शर्मा यांच्या पाठपुराव्याला यश




ठळक मुद्दा

जुना कपडा बाजार चौक ते शिवाजी पार्कपर्यंत विद्युत रोषणाई करण्यासंदर्भात प्रस्ताव पास झाला.


अकोला: शहर विकासासाठी रस्ते रुंदीकरण करून दळणवळणाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने भाजपा - शिवसेना महायुतीचे सरकार असताना, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून भरघोस निधी आणून, शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे आमदार गोवर्धन शर्मा यांनी शहराचे रस्ते मोठे करून विकास पर्व गती दिली. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याचे काम थांबले होते. तसेच टिळक रोडचे काम थांबले होते. याविषयी आमदार गोवर्धन शर्मा यांनी राज्याचे बांधकाम मंत्री नामदार अशोक चव्हाण व बांधकाम सचिव यांची भेट घेऊन काम पूर्ण करण्यास  साकडे घातले. त्यामुळे शहरातील अर्धवट बांधकाम असलेल्या रस्त्यांचे काम सुरू झाले. 




आमदार गोवर्धन शर्मा यांनी खोलेश्वर येथील सरकारी बगीच्या ते लक्झरी बस स्टँड पर्यंतचा अर्धवट असलेल्या रस्ता कामासाठी सुद्धा निधी देण्याची मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. तसेच या रस्त्यातील दुरुस्ती संदर्भात सुद्धा आमदार शर्मा यांनी बांधकाम सचिव व नामदार चव्हाण यांना माहिती दिली आहे.  रस्त्याची दुरुस्ती त्वरित करण्यात येऊन अर्धवट रस्ते पूर्णत्व करण्यात यावी, अशी मागणी केली. त्याची दखल घेत  बांधकाम मंत्री यांनी बांधकाम विभागाला रस्ते पूर्ण करण्याचे निर्देश दिले व काम शीघ्र गतीने सुरू झाले आहे. तसेच अकोला महानगरपालिकेच्या वतीने जुना कपडा बाजार चौक ते शिवाजी पार्कपर्यंत विद्युत रोषणाई करण्यासंदर्भात प्रस्ताव पास झाला असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. 




माजी केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे, जिल्हा उपाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने व नगरसेवक लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून  शहराचा विकास सुरू असून, सबका साथ सबका विकास सबका विश्वास यादृष्टीने भारतीय जनता पार्टीची वाटचाल सुरू आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे आभार व्यक्त केले.  या भागातील नागरिकांना सुविधा तसेच व्यापाऱ्यांना सुद्धा या रस्त्याच्या मुळे लाभ होणार आहे.  

टिप्पण्या