Akola city: Sealed, talkie: tax: मनपाची धडक कारवाई; एका टॉकीजसह दोन उद्योगपतींची मालमत्ता केली सील


Corporation's dhadak action;  Sealed two large establishments with one talkie (मनपा पथक वसंत टॉकीज येथे कारवाई करतेवेळी)




अकोला: महानगरपालिका दक्षिण क्षेत्रांतर्गतील मंगलवारा जवळील वसंत टॉकीज वार्ड क्रं. डी-1, मालमत्‍ता क्रं. 61/1 मालमत्‍ता धारक राधाकिशन तोष्‍णीवाल यांचेकडे सन 2019-20 ते सन 2021-22 पर्यंत रक्‍कम रूपये 3,03,601/- एवढा थकीत असल्‍यामुळे टॉकीज हॉल, ऑफीस व मेन गेटवर सील लावण्‍याची कारवाई आज मनपा द्वारा करण्‍यात आली. 




मूर्तिजापूर रोड वर दोन ठिकाणी कारवाई



तसेच वार्ड क्रं.डी-2 मधील मालमत्‍ता क्रं. 3087 सुशील कुमार खोवाल रा.मुर्तिजापुर रोड यांचेकडे सन 2017-18 ते सन 2021-22 पर्यंत रक्‍कम रूपये 3,85,985/- एवढा थकीत असल्‍यामुळे तसेच वार्ड क्रं. डी-12 मालमत्‍ता क्रं. 1422 नरेश अग्रवाल रा.मुतर्जिापुर रोड, शिवणी यांचेकडे सन 2017-18 ते सन 2021-22 पर्यंत रक्‍कम रूपये 10,03,907/- एवढा थकीत असल्‍यामुळे त्‍यांच्‍या मालमत्‍तांवर आज  26 जुलै रोजी मनपा आयुक्‍त नीमा अरोरा यांच्‍या  आदेशान्‍वये सील लावण्‍याची कारवाई करण्‍यात आली आहे.




ही कारवाई मनपा उपायुक्‍त यांच्‍या मार्गदर्शनात झाली असून या कारवाई पथकात  क्षेत्रीय अधिकारी देवीदास निकाळजे सहा.कर अधिक्षक प्रशांत बोळे, महेंद्र लंगोटे, संतोष खाडे, रवि सोनोने, उदय ठाकुर, प्रधान देवकते, गजानन तायडे व सचिन सदाफुले यांचा समावेश होता.



शहरातील नागरिकांनी आपला थकित व चालू कराचा भरणा वेळेवर करून सील व जप्‍ती  सारख्‍या अप्रिय कार्यवाही टाळून मनपा प्रशासनास सहकार्य करण्‍याचे आवाहन मनपा प्रशासनाव्‍दारे करण्‍यात आले आहे.


टिप्पण्या