- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा २०२१ या वर्षात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. म्हणजेच १०१ टक्के एवढा पाऊस पडेल. केरळमध्ये ३ जून रोजी मान्सूनचे आगमन होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
कसा राहील यंदाचा पाऊस
जूनच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये कमी ते मध्यम तर शेवटच्या पंधरवाड्यात मध्यम अथवा त्यापेक्षा जास्त असा पाऊस पडणार. पावसाचा जोर १५ ते २५ जून दरम्यान राहील, असा अंदाज आहे.
जुलै मध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठ दिवसात पावसाचा जोर जास्त राहील. नंतरच्या दिवसात पावसाचा जोर कमी होईल.
सप्टेंबरच्या प्रारंभी कमी पाऊस पडेल. मात्र, २० सप्टेंबर नंतर पुढील दहा चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे.
ऑक्टोबर मध्ये पावसाच्या तीव्रतेत चढउतार होईल. पहिल्या दहा दिवसांत आणि शेवटच्या दहा-बारा दिवसांत पावसाचा जोर अधिक जाणवेल.
१० नोव्हेंबर पर्यंत पावसाचा शेवटचा टप्पा असेल. त्यानंतर गुलाबी थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील स्थिती
महाराष्ट्रात २२ जून ते ८ ऑगस्ट या कालावधीत पर्जन्यवृष्टी होईल. २२ जून ते १७ जुलै दरम्यान राज्यात उत्तम पावसाची शक्यता आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातही राज्यात पावसाची स्थिती चांगली राहील,असा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा