- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
vegetables fruits market:Akola: 15 जुन पर्यंत जनता भाजी बाजार येथे फक्त किरकोळ भाजी व फळ विक्रीस मुभा – मनपा प्रशासन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला: अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आळा घालण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांचे 31 मे रोजी प्राप्त आदेशान्वये शहरी व ग्रामीण भागा करीता 15 जून चे रात्री 12 वाजे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्या बाबतचे आदेश निर्गमीत झाले आहेत. त्या अनुषंगाने मनपा आयुक्त नीमा अरोरा यांच्या आदेशान्वये शहरातील जनता भाजीबाजार संदर्भाने आदेश निर्गमित करण्यात आले असून,15 जुन पर्यंत जनता भाजी बाजार येथे फक्त किरकोळ भाजी व फळ विक्रीस मुभा देण्यात आली आहे.
काय आहेत आदेश
1. जनता भाजी बाजार येथील किरकोळ भाजीपाला व फळ व्यवसायीकास भाटे क्लब येथे व्यवसाय करण्याबाबत यापूर्वी पारीत करण्यात आलेले आदेश रदद करण्यात आले असून त्यांना जनता भाजी बाजार येथे शासनाने दिलेल्या विहीत वेळेत व्यवसाय करण्यास मुभा राहील.
2. जनता बाजार येथील सर्व प्रकारच्या जीवनावश्यक दुकाने, किराणा, औषधी दुकाने ही सकाळी 7 ते दुपारी 2 वाजे पर्यंत व कृषीसेवा केंद्राची दुकाने ही सकाळी 7 ते दुपारी 3 वाजे पर्यंत सुरु राहतील.
3. तसेच या व्यतीरीक्त इतर बिगर अत्यावश्यक दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील मात्र शनिवार व रविवार रोजी पूर्णत: बंद राहतील.
4. महात्मा फुले भाजी बाजार - वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार - लोणी रोड या ठिकाणी घाऊक व्यवसाय करण्याकरिता आवश्यक व्यवस्था असल्यामुळे पर्यायी जागा म्हणुन जनता भाजी बाजाराचा यापूढे हर्रासी करीता वापर करता येणार नाही. उपरोक्त व्यवसाय धारकांना व्यवसाय करतांना सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. हे आदेश 1 जून 2021 रोजी सकाळी 8 वाजता पासून लागू होतील,असे आदेशात म्हंटले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा