- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Unlock: Akola:Level-2: 21June: सिनेमागृह, रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत तर सर्व प्रतिष्ठाने सायंकाळ ७ वाजेपर्यंत सुरू, क्रीडा उपक्रम नियमित;शहरी व ग्रामीण भागाकरिता विविध सेवांबाबत निश्चित झालेल्या वेळा जाणून घ्या
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
File photo
ठळक मुद्दा
अकोला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत झाला निर्णय
अकोला: जिल्ह्याचा कोविड पॉझिटीव्हीटी दर ४.९७ टक्के व ऑक्सिजन बेडवरील रुग्ण संख्या दर १३.७१ टक्के दर्शविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सोमवार २१ पासून पुढील आदेशापर्यंत सुरु करावयाच्या विविध सेवांबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज निर्गमित केले. त्यानुसार निर्बंधात आणखी शिथिलता देण्यात आली आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत आज जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. कुसुमाकर घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या निर्णयानुसार, जिल्ह्याचा कोविड पॉझीटीव्ही रेट व उपलब्ध ऑक्सीजन बेडची स्थिती लक्षात घेता Level-2 नुसार निर्बंधासह अकोला शहर तसेच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता सोमवार २१ जून च्या सकाळी सात वाजेपासून पुढील आदेशापर्यंत विविध सेवांबाबत वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.
निश्चित करण्यात आलेली वेळ
१ अत्यावश्यक वस्तुंशी संबंधीत दुकाने/ प्रतिष्ठाने / आस्थापना.
सायंकाळी सात वाजेपर्यंत
( दुध व औषधीची दुकाने नियमित वेळेनुसार )
२ बिगर अत्यावश्यक वस्तुंशी संबंधीत दुकाने/ प्रतिष्ठाने / आस्थापना
सायंकाळी सात वाजेपर्यंत
३ चित्रपटगृहे , नाट्यगृहे, मनोरंजन केंद्र
५० टक्के आसन क्षमतेसह रात्री १० वाजेपर्यंत
४ रेस्टॉरेंट / भोजनालय
५० टक्के आसन क्षमतेसह. रात्री दहा वाजेपर्यंत
५ सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, जॉगींग पार्क/सायकलिंग
नियमित
६ खाजगी कार्यालये
नियमित वेळेनूसार
७ सर्व शासकीय तसेच खाजगी कार्यालय उपस्थिती
१०० टक्के उपस्थितीसह
८ सर्व क्रीडा विषयक उपक्रम
नियमित.
९ सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम/ स्नेह संम्मेलन, मनोरंजनात्मक कार्यक्रम
५० टक्के आसन क्षमतेसह.
सायंकाळी सात वाजेपर्यंत
१० लग्न समारंभाचे आयोजन
मंगल कार्यालय/ सभागृहामध्ये
( आसन क्षमतेच्या ५० टक्के किंवा १०० व्यक्ती या पैकी जे कमी असेल. )
११ अंत्यविधी
५० व्यक्ती मर्यादेत
१२ स्थानिक स्वराज्य संस्था /सहकारी संस्था यांच्या सर्व साधारण सभा आयोजन/ निवडणूक
सभागृहाच्या ५० टक्के क्षमतेसह.
१३ बांधकाम
नियमित
१४ कृषी विषयक सेवा व सेवा केन्द्र
नियमित वेळेनूसार
१५ ई-कॉमर्स वस्तु व सेवा
नियमित वेळेनूसार
१६ जीम/व्यायामशाळा/सलुन/ब्युटी पार्लर/स्पा/वेलनेस सेंटर
५० टक्के क्षमतेसह सायंकाळी सात वाजेपर्यंत
१७ सार्वजनिक वाहतूक
नियमित (उभ्याने प्रवास करता येणार नाही)
१८ सर्व प्रकारची कार्गो वाहतूक
नियमित
१९ आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक
( खाजगी, कार, टॅक्सी, बस, रेल्वे ई. द्वारे )
आंतरजिल्हा प्रवासी वाहतूकीस मुभा असेल, तथापि Level - ५ मधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडे ई-पास असणे अनिवार्य राहील.
२० औद्योगिक केन्द्र / एमआयडीसी
नियमित
२१ उत्पादन क्षेत्र ( अत्यावश्यक वस्तु व त्याकरिता लागणारा कच्चा माल, उत्पादक व पॅकेजींग व संपूर्ण साखळीतील सेवा व निरंतर प्रक्रिया असलेले उद्योग, सरंक्षण संबधीत उद्योग, डाटा सेंटर / क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर / माहिती व तंत्रज्ञान सेवा संबंधी / गुंतागुतीचे पायाभुत सेवा व उद्योग )
नियमित
२२ उत्पादन क्षेत्र ( अत्यावश्यक सेवा व निरंतर प्रक्रिया उद्योग, निर्यात प्रधान उद्योग वगळून इतर सर्व प्रकारचे उद्योग जे अत्यावश्यक सेवा अंतर्गत समाविष्ट नाही व निर्यात प्रधान नाहीत.)
नियमित
जमावबंदी लागू
१. संपूर्ण अकोला शहर व जिल्हातील शहरी व ग्रामीण भागामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता- १९७३ चे कलम १४४ अन्वये अंतर्गत जमावबंदी लागू राहील.
२. उपरोक्त नमूद विवरणपत्रानुसार जी आस्थापना / दुकाने / प्रतिष्ठाने ई ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत स्वच्छता व सार्वजनिक शिस्तीचे पालन करावे.
३.कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करण्याबाबतचे आदेश यापूढेही कायम राहतील. या बाबतची तपासणी तसेच अंमलबजावणी ही संबंधीत अनुज्ञप्ती प्राधिकारी, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, परिवहन विभाग यांची राहील.
हे आदेश सोमवार २१ जूनच्या सकाळी सात वाजेपासून पुढील आदेशापर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता लागू राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तिंविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा