Shegaon:pandharpur: अखेर शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाचे कामाला तात्काळ सुरवात; आमदार सावरकर यांच्या प्रयत्नांना यश




अकोला: शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाचे काम तत्काळ सुरु करा अन्यथा १५ जून  पासून महाविकास आघाडी व सार्वजनिक बांधकाम  विभाग विरुद्ध जन आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग  (जागतिक बांधकाम प्रकल्प)  सरनाईक यांना एका निवेदनाद्वारे दिला होता. आज शेगाव पंढरपूर या रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाले असून लवकरच वारकरी तसेच दळणवळणाच्या साठी माळेगाव तसेच शेगाव अकोला मार्गाला गती प्राप्त होऊन नागरिकांना उत्तम सोय उपलब्ध होणार आहे. 




आमदार रणधीर सावरकर यांच्या मागणीची दखल 


जिल्हा प्रशासन बांधकाम विभाग व राज्य शासनाने घेऊन कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे या भागातील नागरिक व वारकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण असून जिल्हा भाजपा अध्यक्ष रणधीर सावरकर प्रयत्नामुळे कामाला सुरुवात झाली आहे.



शेगाव ते वाडेगाव 


सावरकर यांनी शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गावरील शेगाव ते वाडेगाव पर्यंत रस्त्याची अवस्था व तत्कालीन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भक्तांच्या सुविधेसाठी HAM अन्यूईटी कार्यक्रमांतर्गत २४८ कोटी रुपयाचे कामाला मंजुरात देऊन सुरुवात केली होती परंतु राज्यात महा जनादेशाचा अपमान करून स्थापना झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस सरकारने रस्त्याची गेल्या दीड वर्षात या रस्त्याची दुरावस्था करून नागरिकांना त्रास होईल अशी कृती विभागाने व सरकारने केली आहे. वारंवार निवेदने, विनंती केल्यावर सुद्धा दळभद्री सरकार विकास कामांना स्थगिती देऊन खीळ घालण्याचे काम करीत आहे, असा आरोप रणधीर सावरकर यांनी केला. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक शांत बसले होते. परंतु ग्रामस्थ व शेतकरी कोरोना योद्धा म्हणून व सामाजिक दायित्व म्हणून भाजीपाला व अन्न धान्य नागरिकांना अनेक अडचणीतून उपलब्ध करुन देत होते परंतु मिठाला न जगणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने अकोला जिल्ह्यातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले व रस्त्यावर येण्यासाठी भाग पडत असून येत्या १५ जून  पूर्वी पासून रस्त्याचे  काम सुरु करावे अन्यथा रस्त्यावर येऊ असा खरमरीत इशारा जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात  भाजपा शिष्ट मंडळाने देऊन लोक भावना पोहोचविण्याचे काम केले होते. 



आ. सावरकर यांनी या रस्त्यासोबत मेडशी – डव्हा पालखी मार्ग तसेच रिसोड तालुक्यातील, तेल्हारा – हिवरखेड रस्त्याचे प्रश्न उपस्थित करून हे रस्ते सुद्धा त्वरित पूर्ण करा व जिल्ह्याच्या विकासात आडकाठी आणणाऱ्या तत्वांना जनता माफ करणार नाही असा इशारा दिल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सरनाईक यांनी येत्या पाच दिवसात काम सुरु करण्याची हमी दिली व प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे. या वेळी माजी जिल्हा भाजपा अध्यक्ष तेजराव थोरात, जिल्हा उपाध्यक्ष डॉ शंकरराव वाकोडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी, बबलू पाटील वसू, मनोहर मांगटे  आदी यावेळी उपस्थित होते.




यावेळी आमदार सावरकर यांनी अकोला जिल्ह्यात  HAM अंतर्गत एकूण ४ रस्त्यांची कामे निर्माणधीन असून  या ४ पैकी मे.सुधीर कन्स्ट्रक्शन इन्फ्रास्पेस प्रा.लि नागपुर  यांचेकडून 3 रस्त्यांचे बांधकाम होत असून या तीनही रस्त्यांचे बांधकाम अत्यंत धीम्यागती सोबतच बेपर्वाई व दर्जाहीन पद्धतीने  होत आहेत. या ३ कामांपैकी २ कामांच्या काम पूर्णत्वाचा कालावधी ५ फेब्रुवारी २०२१ व १५ मार्च २०२१ रोजी संपलेला असून सदरील कामाच्या सुमारे 50 टक्के काम सुद्धा झालेले नाही, तर उर्वरित १ कामाचा कालावधी २६ जून रोजी (फक्त २० दिवस  शेष आहे) संपत असून एकूण या कामाच्या आवाक्या पैकी सुमारे ४० टक्के काम करण्यात आले आहे असे सांगितले. 



संत गजानन महाराज व पंढरपूर वारीला जाणाऱ्या तसेच शेगाव परिसरासाठी व गायगाव पायदळ वारी भक्तांसाठी तसेच वाहतुकीसाठी महत्वाची व्यवस्था या रस्त्यामुळे होणार आहे. 

टिप्पण्या