Law and Justice: High court: दिव्यांग व्यक्तींना सुलभ वापरासाठी सर्व उच्च न्यायालयांची संकेतस्थळे आता 'दिव्यांगस्नेही'

                                      File photo



महत्वाचा मुद्दा

संकेतस्थळावरील मजकूर जाणून घेणे शक्य होण्यासाठी दृश्य  कॅप्चासह लिखित आणि ऐकता येईल असा श्राव्य  कॅप्चा देखील संकेतस्थळावर उपलब्ध असेल.





नवी दिल्ली: भारतीय न्यायालयीन प्रणालीची डिजिटल पायाभूत सुविधा दिव्यांगांसाठी अधिक सुलभ बनवण्यासाठीचे कार्य गेल्या काही महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या  ई-समितीच्या कामकाजाचा मुख्य घटक आहे. या उद्देशाने, ई-समितीच्या प्रयत्नांनी गाठलेला महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे, सर्व उच्च न्यायालयांची संकेतस्थळे दिव्यांग व्यक्तींना सहजतेने हाताळता यावीत, यासाठी आता ही संकेतस्थळे दिव्यांगस्नेही करण्याच्या दृष्टीने ,'कॅप्चा' ही पूर्णपणे स्वयंचलित चाचणी करणे दिव्यांगांना सुकर होईल हे सुनिश्चित करण्यात आले असल्याची माहिती कायदा आणि न्याय मंत्रालयाने दिली आहे.



दृश्य  कॅप्चासह श्राव्य  कॅप्चा


पूर्णपणे स्वयंचलित चाचणी 'कॅप्चा' ही न्यायालयांच्या  संकेतस्थळावरील , निकाल,  आदेश, याद्या आणि खटल्यांची स्थिती तपासणे अशा अनेक आवश्यक बाबींमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेश बिंदू म्हणून काम करते. उच्च  न्यायालयांच्या  बहुतांश संकेतस्थळांवर आतापर्यंत केवळ दृश्य  'कॅप्चा' वापरण्यात येत होती.  त्यामुळे दृष्टि बधितांना संकेतस्थळ वापरणे आव्हानात्मक होते. संकेस्थळावरील मजकूर स्वतःहून मिळवणे त्यांना अशक्य  होते. सर्व उच्च न्यायालयांच्या समन्वयाने, ई-समितीने आता सुनिश्चित केले आहे की,  दृष्टी बधितांना संकेतस्थळावरील मजकूर जाणून घेणे शक्य होण्यासाठी दृश्य  कॅप्चासह लिखित आणि ऐकता येईल असा श्राव्य  कॅप्चा देखील संकेतस्थळावर उपलब्ध असेल.


 


ई-समितीने  एनआयसीच्या सहकार्याने हाती घेतलेला आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे दिव्यांग व्यक्तींना हाताळता येण्याजोगे एक निकाल शोध पोर्टल (https://juditions.ecourts.gov.in) तयार करणे. या पोर्टलमध्ये सर्व उच्च न्यायालयांनी दिलेला निर्णय आणि अंतिम आदेश आहेत. मजकूर शोधण्यासाठी हे पोर्टल विनामूल्य आहे. याव्यतिरिक्त, हे पोर्टल लिखित  कॅप्चासह ऐकता येईल असा श्राव्य कॅप्चा वापरण्याची सुविधा प्रदान करते. दृष्टीहीन लोकांना संकेतस्थळ वापरणे सोपे जावे यासाठी एकत्रित रकाण्यांचा वापर या पोर्टलवर करता येतो.


 


ई-समितीचे संकेतस्थळ (https://ecommitteesci.gov.in/) आणि ई-न्यायालये संकेतस्थळ  (https://ecourts.gov.in/ecourts_home/) ही संकेतस्थळे दिव्यांग व्यक्तींना सहज वापरता येण्यासाठी दिव्यांगस्नेही आहेत.


 


दिव्यांगजनांना संकेतस्थळ वापरणे  सुकर होण्याच्या दृष्टीने निश्चित मापदंडांचे पालन करत , ई-समिती वेबपृष्ठ एस 3 डब्ल्यूएएएस मंचावर तयार करण्यात आले आहे, असे देखील कायदा आणि न्याय मंत्रालयने स्पष्ट केले आहे.


टिप्पण्या