Inspirational story: भारतीय संगीताचा गोल्डन स्टार नवलकुमार; काय आहे नवल कुमारचा सक्सेस पासवर्ड जाणून घ्या...

          wednesday wisdom

         ॲड.नीलिमा शिंगणे-जगड





अकोला: माटरगाव सारख्या एका छोट्याश्या गावातून केवळ संगीत शिकायचे म्हणून अकोल्यात आलेला नवल कुमारने आज पश्चिम विदर्भाचे नाव उज्वल केले आहे. अवघ्या देशात आपल्या जादुई आवाजाच्या भरवश्यावर नवल कुमारने उच्चस्तरीय स्पर्धा जिंकल्या आहेत. नवल कुमारचा हा सर्व प्रवास येथे उलगडण्याचे निम्मित म्हणजे यंदा नवल कुमार कै. पंजाबराव ठाकरे स्मृती सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. जे भारतीय संगीत विषयातील सर्वोच्च स्थान प्राप्त करणाऱ्याला बहाल करण्यात येते. हे सुवर्णपदक मिळणे एवढं सोपं नसतं, त्यासाठी संयमित आणि नियमित परिश्रम अन रियाज महत्वाचा असतो. यामध्ये गुरूंचे मार्गदर्शन देखील तेवढेच आवश्यक असते. जे नवल कुमारला डॉ.किशोर देशमुख यांनी केले. 




सदतिसाव्या दीक्षांत समारंभात सुवर्ण पदक बहाल


श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अंतर्गत संगीत विभागाचा विद्यार्थी नवलकुमार दिलीप जाधव याने श्री संत गाडगेबाबा अमरावती  विद्यापीठातून वाङ्मय पारंगत (भारतीय संगीत) उन्हाळी 2020 संगीत या विषयात गुणवत्ता यादीत प्रथम स्थान मिळवले. त्याला शुक्रवार 29 मे रोजी पार पडलेल्या सदतिसाव्या दीक्षांत समारंभात  कै. पंजाबराव ठाकरे स्मृती सुवर्ण पदक बहाल करण्यात आले.



नवल कुमारचा यशस्वी प्रवास


नवल कुमार हा माटरगाव (ता. शेगाव, बुलडाणा) येथील एक साधारण परिवारातील विद्यार्थी असून, 2013-14 या वर्षात त्यांनी संगीत विभाग प्रमुख प्रा डॉ.किशोर देशमुख  यांच्याशी संपर्क साधून संगीत विषयात करिअर करण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या वडिलांसह संपर्क साधला. देशमुख यांनी  सर्वतोपरी चाचणी घेतल्यानंतर संगीत शिकविण्यास अनुमती दिली,आणि त्याला अकोला येथे इयत्ता अकरावीला श्री शिवाजी महाविद्यालयात प्रवेश दिला. त्याच बरोबर  विदर्भ संगीत अकॅडमी येथे त्याचे संगीताचे धडे गिरवणे सुरु केले. 




हळू हळू नवलकुमार यानी संगीत क्षेत्रात आपली चुणूक दाखविण्यास सुरवात केली. त्यामुळे देशमुख यांचाही त्याचे बद्दल आत्मविश्वास दृढ होत गेला. त्यानंतर 2015 -16 नवल कुमार स्नातक वर्गात गेला. आणि त्याने त्या कालावधीत संगीतातील विविध स्पर्धा, सांगीतिक समारंभ, युवा महोत्सव इत्यादी मधून नवलकुमार पारितोषिके आणून महाविद्यालयाचे तसेच विदर्भ संगीत अकॅडमीचे नाव लौकिक करु लागला. त्यामुळे सांगीतिक क्षेत्रात सर्व दूर त्याची चर्चा होऊ लागली.





तद्नंतर 2017-18 मध्ये नवलकुमार यांनी स्नातकोत्तर वर्गात M. A. प्रथम वर्षात प्रवेश घेतला. या वर्षात तो सुगम संगीता बरोबरच शास्त्रीय संगीत सुद्धा तयारी निशी गाऊ लागला. यावर्षी त्याने सं. गां. बा. वि. अंतर्गत आयोजित युवा महोत्सवात विविध स्पर्धामध्ये अनेक पारितोषिक मिळाले.




पारितोषिकाचा वर्षाव


M.A.1st.year 

सुगम संगीत कला प्रकारात सं गां बा विद्यापीठातून कलर कोट, राष्ट्रीय कव्वाली स्पर्धा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर - तृतीय क्रमांक , इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवामहोत्सव 2018 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक - सुगम संगीत, भारतीय समूहगान, Folk orchestra, इत्यादी कला प्रकारात विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले.



सेंट्रल झोन - झोनल युथ फेस्टिवल - संबलपूर विद्यापीठ, संबलपूर उडीसा विद्यापीठ प्रतिनिधित्व.


राष्ट्रीय युवा महोत्सव चंदीगड विद्यापीठ, चंदीगड - folk orchestra  चौथा क्रमांक.


SAUFEST आंतर राष्ट्रीय युवामहोत्सव - रविशंकर विद्यापीठ, रायपूर (छत्तीसगड) विद्यापीठ प्रतिनिधित्व अ.भा.गां.म.वि.मंडळ, मुंबई - संगीत विशारद.


M. A. II end year

संगीत कलोपासक राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा, अमरावती - द्वितीय क्रमांक.

युवामहोत्सव सं गा बा वि अमरावती शास्त्रीय गायन - तृतीय क्रमांक.राष्टीय कव्वाली स्पर्धा, इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ, अमरकंटक (मध्यप्रदेश )- तृतीय क्रमांक.


शिवोत्सव 2019 द्वितीय क्रमांक.

क्रीडा युवक संचालनालय, पुणे राज्यस्तरीय युवा महोत्सव, लातूर शास्त्रीय गायन - द्वितीय क्रमांक.



M. A. Semester 4 मध्ये - 99.5% गुण प्राप्त

UGC NET qualified in music - 2020.



एवढा मोठा प्रवास ज्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात यशस्वी केला त्या नवलकुमार दिलीप जाधवचे सर्वदूर कौतुक होत आहे. या यशस्वी प्रवासाचे श्रेय आई - वडील, गुरुतुल्य प्रा. डॉ. किशोर देशमुख,  विभागातील सर्व शिक्षक गण, प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे  व सर्व आप्त मित्र परिवाराला असल्याची प्रांजळ कबुली  नवल कुमार याने दिली.

टिप्पण्या