Coronavirus: Vaccination:Akola: मंगळवार 29 जून रोजीचा लसीकरण कार्यक्रम: कुठे किती डोस उपलब्ध जाणून घ्या

                                       file photo



उद्या दिनांक 29 /6 /2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध आहे


1)कस्तुरबा हॉस्पिटल 

2)भर्तिया हॉस्पिटल  

3)नागरी आरोग्य केंद्र अशोकनगर

 4)नागरी आरोग्य केंद्र उमरी (विठ्ठल नगर मोठी उमरी)

 5)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

6)आर के टी आयुर्वेद कॉलेज जठारपेठ, 

7) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प ( खडकी ग्रामपंचायत)


वरील नागरी आरोग्य केंद्रांवर वय 18 ते 44 साठी COVISHIELD लसीचे (ऑनलाइन अपॉइंटमेंट 100 डोस) व (कूपन पद्धती 100 डोस) सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत उपलब्ध राहतील तसेच या केंद्रावर वय 45 च्या वरील नागरिकांकरिता( 40 ऑनलाइन 100थम तथा द्वितीय) (40 कूपन प्रथम तथा दितीय डोस ) साठी उपलब्ध आहे.



    

 *नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर* येथे वय 18 ते 44 तथा वय 45 चे वरील नागरिकांसाठी Covaxin चा द्वितीय डोस ऑनलाईन तथा कूपन पद्धतीने सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत उपलब्ध राहील.

 

 *स्पेशल सेशन अकोला जिल्हा कारागृह वर्ग- 1* 

(नागरी आरोग्य केंद्र खदान)

पहिला डोस बंदी 331

दुसरा डोस बंदी 23


 *ECHS* 

18 ते 44 साठी COVISHIELD लसीचे (ऑनलाइन अपॉइंटमेंट  100 डोस) 


 *नागरी आरोग्य केंद्र नायगाव बंद राहिल* .


ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील


*अकोला महानगरपालिका अकोला.*





*कोरोना अलर्ट*


*आज सोमवार दि. 28 जून 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-122*

*पॉझिटीव्ह-2*

*निगेटीव्ह-120*


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह-तीन


*अतिरिक्त माहिती*


आज  दिवसभरात दोन अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन पुरुषांचा समावेश आहे. 


त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- तेल्हारा-दोन 


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, फातेमा हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, केअर हॉस्पीटल येथील दोन, असे एकूण 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*


*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-43056+14338+177= 57571*

*मयत-1126*

*डिस्चार्ज-56033*

*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-412*


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)


*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*






रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 423 चाचण्यात एक पॉझिटीव्ह




कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.27) दिवसभरात झालेल्या 423 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.


काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे 11 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला येथे 12, अकोट येथे 30, बाळापूर येथे पाच, अकोला महानगरपालिका येथे 304, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 15, वैद्यकीय महाविद्यालय येथे 32,  हेगडेवार लॅब येथे 14 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 423 जणांच्या चाचण्या होऊन त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 82 हजार 811 चाचण्या झाल्या पैकी 14398 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.


टिप्पण्या