Coronavirus: Vaccination: Akola: आज दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू; एकूण 81 नवे पॉझिटीव्ह, 278 जणांना डिस्चार्ज: उद्याचा लसीकरण कार्यक्रम






अकोला: आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 769 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 718 अहवाल निगेटीव्ह तर 51  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 278  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.



त्याच प्रमाणे काल (दि.9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 30 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 56958(42715+14066+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 51 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 30= एकूण पॉझिटीव्ह- 81.


 


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 280691 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 277241 फेरतपासणीचे 395 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3055 नमुने होते. आजपर्यंत एकूण  280584  अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 237869 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 




51 पॉझिटिव्ह


आज  दिवसभरात 51 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 17 महिला व 34 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापूर-15, बार्शीटाकळी- एक, पातूर- दोन, बाळापूर- चार, तेल्हारा- दोन, अकोट-पाच, अकोला-22. (अकोला ग्रामीण- पाच, अकोला मनपा क्षेत्र-17), दरम्यान काल (दि.9) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 30  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.




278 जणांना डिस्चार्ज


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 14, आयुवेदिक महाविद्यालय येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, यकीन हॉस्पीटल येथील सहा, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथील एक, थोटे हॉस्पीटल येथील  एक, समर्पण हॉस्पीटल येथील  एक, हॉटेल इंदप्रस्त येथील एक,  आयकॉन हॉस्पीटल येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथील सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, देशमुख हॉस्पीटल येथील सहा, फातीमा हॉस्पीटल येथील चार, तर होम आयसोलेशन मधील 230 असे एकूण 278 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.


एकाचा मृत्यू


आज दिवसभरात एकाचा मृत्यूची नोंद झाली.  55 वर्षीय अज्ञात पुरुष रुग्णास  दि. 9 जून रोजी मृतावस्थेत दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.


1929 जणांवर उपचार सुरु


जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 56958(42715+14066+177) आहे. त्यात 1106 मृत झाले आहेत. तर 53923 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1929 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.





उद्याचा लसीकरण कार्यक्रम



*Bhartiya Hospital* 

Covaxin  Vaccine

45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन-second Dose-200

 

(9 am to 2pm)


 *Kasturba Hospital* 

Covaxin  Vaccine

45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन -second Dose-200

 


 *UHC sindhi Camp* 

(खडकी)

Covaxin  Vaccine

 *Online Appointment*

18 ते 44 वर्ष  वयोगटा करिता 

Second Dose-150

(9 am to 2pm)


 *UHC krushi Nagar* 

(मनपा  शाळा क्रमांक 22)

Covaxin  Vaccine

 *Online Appointment*

18 ते 44 वर्ष  वयोगटा करिता 

Second Dose-200

(9 am to 2pm)

 

 *UHC Ashok Nagar* 

( आयुर्वेदिक दवाखाना)

Covaxin  Vaccine

 *Online Appointment*

18 ते 44 वर्ष  वयोगटा करिता 

Second Dose-150

(9 am to 2pm)


 *UHC Naigoan* 

ना. आ. केंद्र नायगांव ( APMC मार्केट जवळ )

Covaxin  Vaccine

 *Online Appointment*

18 ते 44 वर्ष  वयोगटा करिता 

Second Dose-150

(9 am to 2pm)



 *UHC Hariherpeth* 

Covaxin  Vaccine

 *Online Appointment*

18 ते 44 वर्ष  वयोगटा करिता 

Second Dose-200

(9 am to 2 pm)



 **UHC Umari* 

Covishield  Vaccine 

 45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन

Total Doses-150

First Dose-120

Second Dose-30

(9 am to 2 pm)



 *RKT College* 

 *Covishield  Vaccine

45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन

Total Doses-150

First Dose-120

Second Dose-30

(9am to 2 pm)



 *UHC khadan,** (शाळा क्रमांक 16 आदर्श कॉलनी)

Covishield vaccine

45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन

Total Doses-200

First Dose-150

Second Dose-50

(9am to 2 pm)



दिनांक 11/6/2021 ला या ठिकाणी लसीकरण  चालू राहील. ऑनलाईन अपॉइंटमेंट लसीकरणाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपासून ते स्लॉट पूर्ण होईपर्यंत किंवा सेशन पूर्ण होई पर्यंत सुरू राहतील.




महत्वाची सूचना


शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सेशन रविवार दि. 13/06/2021 रोजी भरतीया हॉस्पिटल , टिळक रोड येथे सकाळी 9-11 या वेळेत ठेवण्यात आले आहे. त्याकरिता आवश्यक कागदप्रांसह लसीकरण सत्रास यावे. ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांनी आपली कागदपत्रे RCH कार्यालय, मुख्य पोस्ट ऑफिस च्या बाजूला श्री अग्रवाल व श्री नाईकवाडे यांच्याकडे चेक करून आपले नाव नोंदवून ठेवू शकता. (वेळ स. 11 ते दु. 2)

टिप्पण्या