- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Coronavirus: India: केवळ महागड्या औषधाच्या विक्रीसाठी कोरोना हे जागतिक स्तरावरील मोठे षडयन्त्र- बिस्वरूप राय चौधरी यांचा गंभीर आरोप
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
निसर्गोपचार व आहाराच्या योग्य नियोजनाने कोरोनाचा रुग्ण बरा होतो- डॉ. बिस्वरूप राय चौधरी यांचा दावा
अकोला: देशातील नागरिकांना सतत भीती च्या सावटा खाली ठेवुन महागडया औषधाच्या विक्रीचे कोरोना हे एक मोठे षड्यन्त्र आहे, असा घणाघाति आरोप नवी दिल्ली येथील जागतिक कीर्तिचे मेडिकल न्यूट्रीशनिस्ट व डायटिशियन डॉ. बिस्वरूप राय चौधरी यांनी केला.
कान्हेरी येथे पोहरे फार्म हॉउस येथे निर्माण करण्यात आलेल्या कमला नॅचरल हीलिंग सेंटर (निसर्गोपचार केन्द्र) चे उद्घाटन डॉ बिस्वरूप राय चौधरी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नागपूरचे पलमोनोलोजिस्ट डॉ. के बी तुमाने, मर्म चिकित्सक डॉ. सुधीर कांडेकर, जेष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, साधना पोहरे या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
कोरोना हा आजार नसून साधा फ्लू, निमोनिया
डॉ. चौधरी यानी पुढे सांगितले की, कोरोना हा आजार नसून हा साधा फ्लू, निमोनिया आहे. मागील अनेक काळा पासून हा संसर्ग जन्य आजार चालत आलेला आहे. यावर अनेक औषधी उपलब्ध आहेत. परंतू जागतिक स्तरावर कांही विशिष्ट व्याक्तिनी एकत्रित बसून या साध्या आजाराला कोरोनाचे नाव दिले. त्यावर उपचारा करीता महागडया औषधाचा वापर करण्यास रुग्ण व डॉक्टर्स ला बाध्य केले. नागरिकामधे कोरोनाचे नावावर मोठ्या प्रमाणात भीति निर्माण केली आणि या प्रचंड भीतिच्या सावटा खाली लोकांना ठेवून आपला कुत्सित हेतु साध्य करण्याचे हे षड्यन्त्र केले आहे, असा स्पष्ट आरोप डॉ चौधरी यानी यावेळी केला. तर निसर्गोपचार व आहाराच्या योग्य नियोजनाने कोरोनाचा रुग्ण बरा होतो, असा दावा यावेळी डॉ. चौधरी यांनी केला.
आता पर्यंत 55000 रुग्ण स्वस्थ
अहमदनगर येथे निसर्गोपचार केंद्र उभारून साध्या औषधाने आता पर्यंत 1100 रुग्ण बरे झालेले असून देशामधे आता पर्यंत 55000 रुग्णाना आपण याच पद्धतीने स्वस्थ केले असल्याचे डॉ चौधरी यानी सांगितले. अशा रुग्णाना ऑक्सीजनची किती गरज आहे याची शहानिशा न करता त्यांना मोठ्या हॉस्पिटलमधे भर्ती करण्यासाठी बाद्ध करण्यात येत आहे. गरज नसताना त्यांना ऑक्सीजन दिले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
तर निसर्गोपचार पद्धतीने अकोला पूर्णपणे अनलॉक
अकोला सध्या तिसऱ्या स्तरावर असल्याचे आरोग्य विभागाने जाहिर केले आहे. रुग्णाना रुग्णालयात मुद्दाम ऑक्सीजनचे बेड वर ठेवण्यात आलेले आहे. कारण, अकोला तिसऱ्या स्तरावर त्यांना दाखवायचे आहे. येत्या तीन दिवसात अकोल्यातील रुग्णालय मधील रुग्णाना कृत्रिम ऑक्सीजन पासून मुक्त करुन निसर्गोपचार पद्धतीने अकोला पूर्णपणे अनलॉक करु शकतो, असा दावा डॉ चौधरी यांनी यावेळी केला.
अहमदनगर येथे उपक्रम
अहमदनगर येथे आपण हा उपक्रम करुन रुग्णाना हॉस्पिटल मधील कृत्रिम ऑक्सीजन पासून मुक्त करीत आहो, असे डॉ चौधरी यानी सांगितले. आपण करीत असलेले कोरोनाचे संदर्भातील आरोप जर खोटे वाटत असतील तर ते आपण खरे सिद्ध करुन देण्यास तयार आहोत, असे देखील डॉ चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
खुले आव्हान
या संदर्भात डॉ. चौधरी यानी लिहिलेल्या 'कोरोना का सच' या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी प्रकाश पोहरे यांचे हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या संदर्भात आपण आपल्या विधानांवर ठाम असून या विषया वर कधीही कुणाशीही चर्चा करण्यास तयार असल्याचे डॉ. चौधरी यांनी यावेळी खुले आव्हान केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा