Touktae cyclone: Akola: मराविकंचे युद्धस्तरावर कार्य; रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा पूर्ववत




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: मंगळवारी सायंकाळी आलेल्या तौक्ते वादळ व पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यामुळे  विद्युत तारा तुटल्याने चार ते पाच तास शहर अंधारात गडप झाले होते. म रा वि कं ने युद्धस्तरावर कार्य करून विद्युत पुरवठा पूर्ववत केल्याने अकोलकर सुखाने झोपू शकले.



मोठ्या प्रमाणात झाड पडल्यामुळे वीज वितरण कंपनीला अडचण येत होती. तेरा फिडर मधील 6 फिडरची लाईन सुरू करण्यात रात्री 10.30 ते 11 वाजेपर्यंत यश आले. अन्य फिडर सुरू करण्यात युद्धस्तरावर काम सुरू केले. मात्र गांधी रोड,जयहिंद चौक आदी अनेक ठिकाणी पिंपळाचे मोठे वृक्ष पडल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी विद्युत खांब पडल्यामुळे विद्युत कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. जुने शहर, अकोट फाइल, चित्रा फिडर, जठारपेठ फिडर जवाहर नगर फिडर येथे मनपा तसेच वीज वितरण वीज वितरण कंपनीने काम सुरू आहे.



मराविकं.चे कार्य कौतुकास्पद 


मंगळवारी संध्याकाळी वादळाच्या जोरदार तडाख्यात शहरात अनेक लहान मोठे झाड उन्मळून पडले. विजेचे काही खांब उखडल्या गेले. विज पुरवठा खंडीत झाल्याने परिस्थिती भयंकर झाली होती. असे असताना वाटत नव्हत की, आज रात्री विद्युत लाईन सुरू होईल मात्र म रा वि कं. चे संबंधित अधिकारी कर्मचार्‍यानी शर्थीचे प्रयत्न करीत युद्धस्तरावर काम केले. शहरातील जवळपास बंद पडलेले 13 फीडर पैकी 5-6 फीडर वरून विज पुरवठा पूर्ववत करण्यास 10.30 वाजताच्या सुमारास यश मिळविले. यानंतर जुन्या शहरातील गुलजारपुरा, डाबकी रोड, गणेश नगर आदी भागात वीज पुरवठा रात्री 11 वाजता नंतर सुरळीत केल्याने  नागरिक सुखावले. दरम्यानच्या कालावधीत अकोलेकरांना डासांच्या उद्रेकाचा सामना करावा लागला. 



कोविड रुग्णांना त्रास


वादळाचा फटका कोविड रूग्णांना देखील बसला. अकोला शहर विभागातील 33 केव्ही क्षमतेचे चार विद्युत उपकेंद्र बंद पडल्याने अर्ध्या शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोविड सेंटर, जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय व ऑक्सिजन प्लांटचा वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या भागातील विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य दिले. यानंतर काही वेळाने पुरवठा सुरळीत झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांना दिलासा मिळाला.  



शहरातील 11 केव्हीच्या 38 फिडर्सवरील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. कौलखेड, मलकापूर उमरी, जठारपेठ आदी भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते.





टिप्पण्या