Tauktae cyclone:Alert:धोक्याचा संदेश: संध्याकाळी तोक्ते चक्रीवादळ गुजरात किनाऱ्याला धडकणार; रात्री अति तीव्र चक्रीवादळ म्हणून पुढे सरकेल…




*भूविज्ञान मंत्रालय:अति तीव्र तौक्ते चक्रीवादळ (पूर्व मध्य अरबी समुद्रावर अति तीव्र चक्रीवादळ : चक्रीवादळ इशारा आणि गुजरात आणि दीव च्या किनारपट्टीवर धडकल्यानंतरच्या स्थितीबाबत अंदाज- धोक्याचा संदेश)



नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 तारखेच्या संध्याकाळी तोक्ते चक्रीवादळ गुजरात किनाऱ्याला धडकणार असून पोरबंदर आणि भावनगर जिल्ह्यातल्या महुवा मधून 17 मे च्या रात्री 8 ते 8.30 वाजताच्या दरम्यान अति तीव्र चक्रीवादळ म्हणून पुढे सरकेल, असा अंदाज  आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 155-165 किमी राहणारा असून हा वेग ताशी 185 किमी पर्यंत जाण्याची शक्यता आहे.



पूर्वमध्य अरबी समुद्रावरचे अति तीव्र चक्रीवादळ तौते, गेल्या सहा तासापासून उत्तर- वायव्येकडे ताशी 20 किलोमीटर वेगाने सरकत असून अतिशय तीव्र चक्रीवादळात त्याचे रुपांतर झाले आहे. ते पश्चिम- नैऋत्य मुंबईपासून १६० किमी, गुजरातमधल्या वेरावळ पासून 290 किमी, दक्षिण- आग्नेय दीवपासून 250 किमी तर पाकिस्तान मधल्या कराची पासून 840 किमीवर आहे, असे भारतीय हवामान विभागाकडून आज सकाळी जारी केलेल्या पत्रकात म्हंटले आहे.


उत्तर- पश्चिमेकडे वादळ सरकण्याची शक्यता असून 17 तारखेच्या संध्याकाळी ते गुजरात किनाऱ्याला धडकणार असून पोरबंदर आणि भावनगर जिल्ह्यातल्या महुवा मधून 17 मे च्या रात्री 8 ते 8.30 वाजताच्या दरम्यान अति तीव्र चक्रीवादळ म्हणून पुढे सरकेल असा अंदाज आहे, या काळात वाऱ्याचा वेग ताशी 155-165 किमी राहणारा असून हा वेग ताशी 185 किमी पर्यंत जाण्याची शक्यता आहे.


 

यासंदर्भात तपशील 


कोकण आणि लगतचा मध्य महाराष्ट्र : 17 मे रोजी बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार आणि 18 मे रोजी उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता




गुजरात : 17 आणि 18 मे रोजी सौराष्ट्राच्या दक्षिणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस,काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी अति मुसळधार. याच काळात कच्छ मध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार



 राजस्थान : 18 मे रोजी दक्षिण राजस्थानमध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस,तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर 19 मे रोजी राजस्थानमध्ये तुरळक ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस


 वाऱ्याबाबत इशारा 


येत्या सहा तासात पूर्व मध्य अरबी समुद्रात वादळी वाऱ्याचा वेग ताशी 180–190 किमी वर पोचण्याची शक्यता असून हा वेग ताशी 210 किमी वर जाण्याची शक्यता


महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 17 मे रोजी ताशी 80–90 किमी वेगाने वारे वाहणार असून हा वेग ताशी 100  किमी वर जाण्याची शक्यता त्यानंतर हा वेग मंदावेल


ईशान्य अरबी समुद्रालगत ताशी 90 – 100 किमी वेगाने वादळी वारे वाहणार असून हा वेग ताशी 110  किमी वर जाण्याची शक्यता आहे.दुपारपर्यंत हा वेग वाढून तो ताशी 170–180 किमी वर आणि ताशी 200 किमी पर्यंत वाढण्याची शक्यता असून त्यानंतर हा वेग कमी होईल.



दक्षिण गुजरात आणि दमण आणि दीव च्या किनाऱ्या लगतच्या परिसरात ताशी 70-80 किमी वेगाने वादळी वारे वाहणार असून हा वेग ताशी 90 किमी वर जाण्याची शक्यता. 



गुजरातच्या किनारपट्टीवर ( जुनागड,गीर सोमनाथ, अमरेली,भावनगर) इथे वाऱ्याचा वेग ताशी 155-165 किमी राहणार असून हा वेग ताशी 185 किमी वर जाण्याची शक्यता तर भरूच, आणंद, दक्षिण अहमदाबाद,बोताड आणि पोरबंदर इथे ताशी  120 -140 किमी वेगाने वारे वाहणार असून हा वेग 165 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 



आज मध्यरात्री पासून ते 18 च्या पहाटे पर्यंत गुजराथच्या देवभूमी द्वारका, जामनगर, राजकोट,मोरबी, खेडा जिल्ह्यात ताशी 90 -100 किमी वादळी वारे वाहतील हा वेग 120 कि मी पर्यंत जाण्याची शक्यता. 


17 मे ची संध्याकाळ ते 18 मे सकाळ पर्यंत दादरा, नगर हवेली, दमण, वलसाड, नवसारी, सुरत, सुरेद्र नगर जिल्ह्यात  ताशी 80- 90 किमी वेगाने  वादळी  वारे वाहतील हा वेग ताशी 100 किमी पर्यंत जाण्याची शक्यता 


 समुद्राची स्थिती 


पूर्व मध्य आणि ईशान्य अरबी समुद्रात 18 मे च्या सकाळ पर्यंत समुद्र  खवळलेला राहील त्यानंतर तो निवळेल

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येत्या 12  तासात समुद्रात उंच लाटा उसळतील  त्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल.

येत्या सहा तासात दक्षिण गुजरात, दमण,दीव,दादरा नगर हवेली किनारपट्टीवर उंच लाटा उसळतील 18 च्या सकाळपर्यंत समुद्र खवळलेला राहील. त्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल.

 


वादळाच्या तीव्रतेचा इशारा  


अमरेली, गीर सोमनाथ, दीव, भावनगर इथे 3 मीटर उंचीच्या लाटा  उसळतील, भरूच, आणंद, अहमदाबादचा  दक्षिणेकडील भागात 2-3 मीटर तर , सूरत, नवसारी, वलसाड इथे 1-2 मीटर आणि गुजराथच्या उर्वरित किनारी जिल्ह्यात 0.5 – 1 मीटर उंचीच्या लाटा येतील.

 


मच्छिमारांना इशारा


18 मे पर्यंत पूर्व मध्य आणि ईशान्य अरबी समुद्र, गुजरात, दमण दीव दादरा नगर हवेली किनार पट्टीवर मासेमारी पूर्णतः बंद राहील. 



मच्छिमारानी 18 मे पर्यंत पूर्व मध्य अरबी समुद्रात, महाराष्ट्र  आणि गोवा किनार पट्टी आणि ईशान्य अरबी समुद्रात, गुजरात, दमण दीव दादरा नगर हवेली किनार पट्टीवर समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.

 


पोरबंदर, अमरेली जुनागड, गीर , सोमनाथ, बोटाड आणि भावनगर आणि अहमदाबादच्या किनारपट्टी भागात  नुकसान होण्याची शक्यता


कच्या घरांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता, पक्क्या घरांनाही काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता


विजेचे आणि दळणवळण करणारे खांब वाकण्याची शक्यता


कच्या आणि पक्क्या रस्त्यांचे नुकसान होण्याची शक्यता, पर्यायी रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता. रेल्वे ओव्हरहेड तारांचे किरकोळ नुकसान होण्याची शक्यता



मिठागरे आणि पिकांचे मोठे नुकसान आणि झुडपे वाहून जाण्याची शक्यता

दृश्यमानतेवर मोठा परिणाम 

 


देवभूमी द्वारका, कच्छ, जामनगर, राजकोट आणि मोरबी, वलसाड, सूरत, वडोदरा, भरुच, नवसारी, आणंद, खेडा आणि गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील अंतर्गत भागांना  नुकसान होण्याची शक्यता 


 


झोपड्यांना मोठे नुकसान होण्याबरोबरच छत आणि पत्रे उडून जाण्याची शक्यता 

विजेचे आणि दळण वळणाच्या   खांबांचे किरकोळ नुकसान


कच्या रस्त्यांचे मोठे तर आणि पक्क्या रस्त्यांचे काही नुकसान होण्याची शक्यता, पर्यायी रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता.


झाडाच्या फांद्या कोसळण्याची, केळी आणि पपयाच्या झाडांचे नुकसान

किनारी पिकांचे मोठे नुकसान

मिठागरांचे नुकसान

 


अपेक्षित कार्यवाही


 असुरक्षित भागातून स्थलांतर

 मच्छिमारी पूर्णतः खंडित

 बाधित क्षेत्रातल्या लोकांनी घरातच राहावे.

टिप्पण्या