Prahar's agitation: प्रहारचे आंदोलन: मोदीजी आता आम्ही शेतकरी टाळी व थाळी वाजवतो… बच्चू भाऊ झाले आक्रमक





भारतीय अलंकार 24

अमरावती: केंद्र शासनाच्या तुर, मुग, उडीद या धान्याच्या आयात धोरणाच्या निषेधार्थ आज सायंकाळी राजकमल चौक, (अमरावती) येथे टाळी आणि थाळी बजाव आंदोलन प्रहारचे नेते तथा राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात करण्यात आले. हे आंदोलन राज्यव्यापी करण्यात आले. प्रत्येक गाव आणि शहरात शेतकरी आणि प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात कोरोना lockdown निर्बंधांचे पालन करीत सहभागी झाले होते. शेतकरी एकजुटीचा विजय असो, अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.




केंद्र सरकारने ६ लाख टन तुर आयात कशासाठी केली?

केंद्राने रासायनिक खताची दरवाढ मागे घेतली आहे.भारतात ४२ लाख टनाची आवश्यकता असुन ४५ लाख टन तुर उपलब्ध आहे. आवश्यकतेपेक्षा २ लाख टन तुर उपलब्ध असताना केंद्र सरकारने ६ लाख टन तुर आयात कशासाठी केली? तसेच तुर, मुग, उडीद आयात पुर्णपणे खुली करुन धान्याचे भाव पाडण्यात येणार. याकरीता प्रहारचे टाली थाली आंदोलन केंद्र शासनाच्या तुर, मुग, उडीद या धान्याच्या आयात धोरणावर आज करण्यात आले,अशी माहिती याप्रसंगी बच्चू कडू यांनी दिली.




मोदीजी, आता आम्ही शेतकरी टाळी थाळी वाजवतो...

मोदीजी तुमच्या मते टाळी व थाळीने कोरोना जाणार होता. आता आम्ही शेतकरी टाळी व थाळी वाजवतो. आमच्या मागण्या पुर्ण करा. एकीकडे कोरोनाने लोकांचे जीव चालले आहे व आता या जुलमी धोरणाने शेतकऱ्यांचा जीव घेवू नका, असे देखील यावेळी बच्चू कडू म्हणाले. 





टिप्पण्या