Pandharpur byelection2021: भालके यांना पंढरपूरची जनता साथ देत असल्याचे चित्र, अवताडे पिछाडीवर!

                                   (File photo)




देशात पाच राज्यांच्या निवडणुकांकडे साऱ्या देशाचं लक्ष लागून आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडु, केरळ आणि पुदुच्चेरीत मतमोजणी सुरु झाली आहे. या व्यतिरिक्त काही राज्यांमध्ये पोट निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. यात २ लोकसभा आणि १४ विधानसभा जागांचा समावेश आहे.


Pandharpur election

पंढरपूर मध्ये भाजपचे समाधान अवताडे आणि महाविकास आघाडीचे भगीरथ भालके यांच्यात थेट लढत सुरू आहे. आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपुरात पोटनिवडणूक झाली आहे.  त्यामुळे आता भारत भालके यांचा मुलगा भगीरथ भालके याना पंढरपूरकर जनता साथ देते, की हा डाव उलटवून समाधान अवताडे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असणार, याची उत्सुकता महाराष्ट्रात लागली आहे. या दोन उमेदवारासह स्वाभिमानीचे सचिन पाटील, अपक्ष शैला गोडसे रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक चौरंगी झाल्याचे चित्र आहे.




*आताच हाती आलेल्या वृत्तानुसार पंढरपूर पोटनिवडणुकीच्या पाचव्या फेरीत आघाडी कायम ठेवण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. दुसऱ्या फेरीपासून भाजपचे समाधान आवताडे सतत पिछाडीवर आहेत.






अन्य ठिकाणच्या निवडणूक


केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर कर्नाटकातील बेळगाव लोकसभेची जागा रिक्त झाली होती. आंध्र प्रदेशातील तिरुपती लोकसभेची जागेवर पोटनिवडणूक पार पडली. वायएसआर काँग्रेस पार्टीचे खासदार बी दुर्गाप्रसाद यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. दोन्ही जागेवर १७ एप्रिलला मतदान पार पडले होते.





याशिवाय ११ राज्यातील १४ विधानसभा जागांवरही पोटनिवडणूक पार पडली होती. त्यासाठी आज मतमोजणी होत आहे. राजस्थानच्या सहारा, सुजानगड आणि राजसमंद तसेच कर्नाटकच्या बसवकल्याण आणि मस्की, गुजरातच्या मोरवा हदप, झारखंडच्या मधुपूर, मध्य प्रदेशच्या दमोह, महाराष्ट्रातील पंढरपूर, मिझोरमच्या सरछिप, नागालँडच्या नोकसेन, ओडिशाच्या पिपिली, तेलंगणातील नागार्जुन आणि उत्तराखंडच्या सलट विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली होती. या ठिकाणी देखील १७ एप्रिलला मतदान झालेले होते. या सर्व जागेवर कोण निवडून येतो,कुणाच्या गळ्यात विजयश्री माळ पडते,याकडे राजकीय पक्षाची नजर आहे.


टिप्पण्या