Murder: crime news: Akola: स्वयंपाक करण्याच्या क्षुल्लक कारणावरून एकाची हत्या; अवघ्या काही तासात आरोपी गजाआड


Killing one for the trivial reason of cooking; The accused disappeared in just a few hours

                                प्रतिकात्मक चित्र





अकोला: अकोट तालुक्यात येणाऱ्या सातपुडाच्या पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या पिंप्री खुर्द शिवारात स्वयंपाक करण्याच्या कारणावरून 1 मे च्या मध्यरात्री एकाची हत्या झाल्याची घटना 2 मे रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणातील आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.




पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेची हकीकत अशी की, अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील गजानन बोदडे यांच्या शेतात संत्रा झाडांची खोड काढण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील गिरगोटी गावातील मजूर कामाला आले होते. छबुलाल भुसुम, प्रभू राजाराम धिकार व रतिराम राजाराम दारसिंबे असे या तीन मजुरांचे नावे आहेत. 1 मे रोजी मजुरांनी दिवसभर शेतात काम करून रात्री दारूची नशा केली होती. त्यानंतर रात्री 12 वाजताच्या सुमारास स्वयंपाक कोण करेल, यावरून भांडण सुरू झाले. भांडण विकोपाला जावून आपसात मारहाण सुरू झाली. यावेळी राजाराम धीकार याने रतीराम दारशिंबे याला मारहाण केल्याने रतीराम याने तेथून पळ काढला. त्यानंतर छबुलाल भुसुम यास प्रभू राजाराम धीकार याने कुऱ्हाडीने मारहाण केली.




या मारहाणीत छबुलाल भुसूम गंभीर जखमी झाल्याने तेथेच त्याने प्राण सोडले. भुसूमचा मृत्यू झाल्याने प्रभु धीकार याने तेथून पळ काढला. रात्र उलटल्यानंतर  सकाळी रतीराम हा शेतात घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याला छबुलाल शुकलाल भुसुम याचा मृतदेह आढळून आला.




रतिराम याने याबाबतची माहिती मजूर कंत्राटदार शरिफोद्दीन नशीरोद्दीन (रा. अकोट) यांना दिली. त्यानंतर पोलीस पाटील, रतीराम, शेतमालक व मजूर   यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी प्रभू धीकार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपीला सोमठाणा येथून अटक केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहे.




अवघ्या काही तासात आरोपी अडकला जाळ्यात


मध्यरात्री हत्याकांडानंतर आरोपी प्रभू धिकार हा घटनास्थळावरून जंगलाकडे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जंगलातून आरोपीला पकडणे म्हणजे महाकठीण काम. मात्र,पोलिसांनी आपली सूत्रे तातडीने हलविली. दरम्यान, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांचा जनसंपर्क कामात आला. आरोपीचे वर्णन देत ठाणेदार व पोलीस पथकाने या भागातील जनतेला सतर्क केले होते. जनसंपर्कातील एका व्यक्तीने ठाणेदार फड यांना माहिती देत आरोपीचे छायाचित्र पाठवून पडताळणी केली. यानंतर  परिसरातील आदिवासी युवकांनी व ग्रामीण पोलिसांनी सोमठाणा येथे घेराव घालून तेथूनही पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पकडले.




टिप्पण्या