Maratha reservation:BJP:Akola: मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय महाविकास आघाडी सरकार डोळे उघडणार नाही- नरेंद्र पाटील यांचे मत






अकोला:  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज रस्त्यावर आल्याशिवाय महाविकास आघाडी सरकार हे डोळे उघडणार नाही. लोकशाही पद्धतीने मराठा समाज आपला लढा उभारणार यासाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी हाक मराठा आरक्षणाची मागणी महाराष्ट्रात सर्वात अधिक करणारे मराठा महासंघाचे संस्थापक आमदार स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजाला करून साथ देण्याची साकडे घातले.  


नरेंद्र पाटील आज रविवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.




आज मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला आरक्षण दिले. परंतु महाविकास आघाडीला आरक्षण टिकवता आले नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावा, याची पुनर्विचार याचिका सरकारने अजून दाखल केली नाही. मराठा समाजाने ओबीसी आरक्षणातून आरक्षण द्यावे अशी मागणी केली नाही. परंतु सत्तारूढ पक्ष मराठा आणि ओबीसी समाज भांडणे लावण्याचं काम करत आहे. सत्ता तुमची निर्णय घेणारे तुम्ही तेव्हा प्रश्न केव्हा निर्माण होतो, असा सवाल नरेंद्र पाटील यांनी केला आहे. 




आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर नरेंद्र पाटील भारतीय जनता पक्षाच्या वतीने मराठा समाजातील आंदोलनातील सामाजिक कार्यकर्त्यांची भेटीगाठी करण्यासाठी अकोल्यात आले. आज त्यांनी प्रदीप खाडे, डॉक्टर अमोल रावळकर, सुनील जानोरकर, संजय लुंगे, संजय राऊत, डॉक्टर शंकरराव वाकोडे, डॉक्टर संजय सरोदे, अवघाते, अरविंद कपले,  विजय बोरकर, मंगेश पाथरीकर, सुरेश गाडे व अनेक मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय केले. ग्रामीण भागातील मराठा समाजाच्या अनेक नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपली मते त्यांच्याकडे मांडली व शंका व प्रश्न उपस्थित करून आरक्षणाच्या आंदोलनाचे दिशानिर्देश संदर्भात मत जाणून घेतले.




भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार भाजपातील मराठा नेते वेगवेळ्या जिल्ह्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार व भाजपाची भूमिका यासंदर्भात मराठा समाजात जनजागृती करत आहे. जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, तेजराव थोरात, आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासोबत सुद्धा त्यांनी चर्चा विनिमय केला. 




पत्रकार परिषद मध्ये त्यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात, गिरीश जोशी, माधव मानकर, अक्षय गंगाखेडकर ,डॉक्टर शंकरराव वाकोडे,  डॉक्टर अमित कावरे मोहन पारधी, अक्षय जोशी, संजय गोडफोडे, हिंगणे, संजय गोंडा, अभिमन्यू नळकांडे उपस्थित होते.

टिप्पण्या