Lockdown: Akola:covid test: विनाकारण रस्त्याने फिरणाऱ्या रिकामटेकड्या नागरिकांची पोलिसांनी करून घेतली कोविड टेस्ट








भारतीय अलंकार 24

अकोला: राज्यात कोरोनाचा थैमान पाहता 15 एप्रिल पासून राज्य शासनाने कडक निर्बंध सह टाळेबंदी व संचारबंदी लागू केली आहे. यामध्ये अत्यावश्यक कामासाठी काही वेळसाठी येणे-जाणे करीत नागरिकांना मुभा दिली आहे.मात्र, एवढे असूनही काही रिकामटेकडी नागरिक कायद्याचे उल्लंघन करीत विनाकारण रस्त्याने फिरत आहेत. या लोकांवर कायदेशीर कारवाई करीत दंडही आकारला गेला. मात्र, या कारवाईचा कोणताच परिणाम बेजबाबदार नागरिकांवर होताना दिसत नाही. यामुळे अकोला पोलिसांनी एक पाऊल उचलत रिकामटेकड्या लोकांची कोविड टेस्ट करवून घेण्यास आजपासून सुरुवात केली आहे.



कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र शासनाने 15 एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू केले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांच्या फिरण्यावर बंदी आणून संचारबंदी जारी केली आहे. त्या सोबतच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची आस्थापने सुरू ठेवली आहेत. परंतू याचा गैरफायदा घेण्याच्या प्रवृत्तीत वाढ होऊन नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाने शहरात मुक्त संचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. 




यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर हे स्वतः रोडवर उतरून  एक्शन मोड वर दिसून आले. तसेच शहर वाहतूक शाखेने सुद्धा अश्या नागरिकांवर धडक कारवाई करून 9 हजाराचे वर दंडात्मक कारवाया करून लाखो रुपये दंड वसूल करून जवळपास 400 चे वर वाहने जप्त करून वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले. शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम हे शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह रस्त्यावर उभे राहून नागरिकांना समजावले. प्रसंगी कारवाई सुद्धा केली. मात्र,नागरिक कशालाच न जुमानत शहरात प्रत्येक रस्त्यावर गर्दी करीत आहेत. 




गर्दी कमी न झाल्यामुळे आज कोतवाली चौकात पोलिसांनी मनपाचे सहकार्याने विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या रिकामटेकड्या नागरिकांची कोविड टेस्ट करण्यास सुरुवात केली. यासाठी पावसचे अजयसिंग सेंगर यांनी स्वमालकीची लॅक्सरी बस वाहन टेस्टिंग साठी उपलब्ध करून दिले. 



150 चे वर नागरिकांची कोविड चाचणी 


शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक उत्तमराव जाधव, शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कोतवाली चौकात समक्ष थांबून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना  चाचणी करून घेतली. यामध्ये जवळपास 150 चे वर नागरिकांची कोविड चाचणी मनपाचे वैद्यकीय चमू कडून करून घेण्यात आली. यावेळी मनपाचे क्षेत्रीय अधिकारी टापरे हे आपल्या वैद्यकीय चमू सोबत उपस्थित होते. तसेच पावस ट्रॅव्हल्स चे पावस अजय सिंह सेंगर हे सुद्धा जातीने हजर होते.




ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, गजानन शेळके यांनी केली.

टिप्पण्या