Fake message: अकोल्यात 9 ते 15 मे पर्यंत कडक lockdown होणार असल्याचा समाज माध्यमात फिरत असलेला तो मेसेज बनावट

                                      file image




अकोला: ग्रामीण व शहरी भागात 9  ते 15 मे पर्यंत कडक लॉकडाउन लागणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर तुफान फिरत आहे. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही आदेश सध्या अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पारित केले नाही.त्यामुळे हा मेसेज बनावट असल्याचे समजते.



या आदेशाच्या मुख्य पत्रावर तारीख नसून शेवटच्या पानावर जिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी देखील झालेली नाही. त्यामुळे सध्या फिरत असलेला हा मेसेज बनावट असल्याचा सांगण्यात येत आहे. जर हेच निर्देश एक दोन दिवसात लागू झाले तर हे पत्र जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरी विना बाहेर कसे आले, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे.



दरम्यान,अकोलेकरांनी अश्या बनावट संदेशावर विश्वास ठेवू नये,असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

टिप्पण्या